कोपरगावात आणखी तिघांना कोरोनाची लागण; आता बाधितांची संख्या ६
– बांधितांमध्ये तीन पुरूष, तीन महिला
– यापूर्वीचे ६ रुग्ण अगोदरच कोरोना मुक्त झाले आहेत.
कोपरगाव :
कोपरगाव येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेण्यात आलेल्या २० रुग्णांपैकी १८ रुग्णांचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. दोन अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. यामध्ये तीन रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल “पॉझिटिव्ह’ आले आहे. तर उर्वरित १५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष विधाटे यांनी दिली.
अधिक माहिती देताना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर म्हणाले, आज प्रात झालेल्या अहवालात डॉक्टर कुटुंबातील तीन जणांचा समावेश आहे तर आहे. यामुळे डॉक्टर सह एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोना लागण झाली आहे. बाधित तीन रुग्णांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. यामुळे उपचार घेत असलेल्या तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या ६ झाली आहे. यात तीन पुरुष तीन महिलांचा समावेश आहे.यातील दोन पुरुषावर जिल्हा शासकीय रूग्णालयात नगर येथे उपचार सुरू आहे तर उर्वरित एकाच कुटुंबातील एक पुरूष व तीन महिला या चार जणांवर एस एस जी एम कॉलेज मुलींचे वसतिगृह येथील कोविड सेंटर येथे उपचार सुरू आहेत यावेळी कोविड सेंटर येथे तहसीलदार योगेश चंद्रे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली बडदे याही रुग्णावर लक्ष ठेवून आहेत.
आजपर्यंत कोपरगावमध्ये १२ जण कोरोना बाधीत झाले असून १४ वर्षाची एक मुलगी ठाणे येथील असल्याने त्या मुलीची नोंद ठाणे येथे करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कोपरगावात आज पर्यंत ११ जण कोरोना बाधीत आढळून आले आहे. यात मुंबईच्या जावयाचा समावेश आहे. जावई महाशयांनी कोरोना रजिस्टरला नोंद करताना श्रीकृष्ण नगर जेऊर पाटोदा कोपरगाव असा पत्ता दिल्यामुळे त्याची नोंद कोपरगाव मध्ये धरण्यात आली आहे अशी माहिती डॉक्टर फुलसौंदर यांनी दिली.
कोपरगावात कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आवागमन करणाऱ्या नागरिकांमुळे हा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोपरगावकरांची चिंता वाढत चालली आहे.