भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर:
स्नेहलता कोल्हे यांना सचिवपदाची
जबाबदारी
भाजप भारतीय जनता पक्षाकडून कामाची व निष्ठेची पावती – माजी आ. स्नेहलता कोल्हे
कोपरगाव :
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यकारिणीत कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या माजी आ. सौ. स्नेहलता बिपीन कोल्हे यांची निवड झाली असून त्यांच्यावर प्रदेश सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (३जुलै) रोजी दुपारी केली आहे.
प्रदेश सचिव माजी आ. स्नेहलता कोल्हे
गेल्या सहा वर्षात भारतीय जनता पक्षात राहून केलेल्या कामाची व निष्ठेची पावती आहे. पक्षाने दाखविलेला विश्वास व टाकलेली जबाबदारी याला तडा न जाऊ देता मिळालेल्या संधीचे सोने करणार असा आत्मविश्वास भाजपचे नवनियुक्त प्रदेश सचिव माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केला.
दरम्यान प्रदेश सचिवपदी नियुक्ती होण्यापूर्वी माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्यावर यापूर्वीच्या आमदार असताना काही काळ त्यांच्यावर सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. २०१४ साली कोपरगाव विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. तालुक्यात महिला बचत गटामध्ये त्यांचे काम लक्षणीय आहे. त्यांनी आमदारकीच्या पाच वर्षाच्या काळात मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. तसेच अनेक वर्षापासून रखडलेल्या अनेक कामांना त्यांनी गती व चालना देऊन प्रत्यक्षात उतरवण्याचे काम केले आहे. आज मतदारसंघात दिसत असलेली मोठमोठाली बांधकामे, कार्यालये, रस्ते ही बरीच कामे त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेल्या पाठपुरावा मेहनतीचे फलित आहे. निळवंडे शिर्डी कोपरगाव योजनेसाठी यांनी सर्व अडथळे पार करीत चार वर्षे मोठा संघर्ष केला आज ही योजना न्यायालयीन लढाईमध्ये अडकली असले तरी भविष्यात ती पूर्णत्वास येईल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. विविध प्रश्न गटांमध्ये त्यांचे काम लक्षणीय तसेच स्नेहलता कोल्हे यांचे बी. ए. पदवी पर्यंत शिक्षण झाले आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मा.मंत्री गिरीष महाजन, मा.मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मा. मंत्री प्रकाश मेहता, मा.मंत्री सुधीर मुनगंटीवार, मा.मंत्री विनोद तावडे, मंत्री पंकजा मुंडे,माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह आजी माजी खासदार, मंत्री अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
चौकट
आमदार म्हणून पाच वर्षात केलेले काम, तसेच नि:स्वार्थीपणे व निष्ठेने भाजपचे काम करणाऱ्या मा. आ. स्नेहलता कोल्हे यांना कोपरगाव मतदार संघात निवडणुकीत भलेही आमदारकीने हुलकावणी दिली असली तरी पक्षाने त्यांच्या कामाचे मोजमाप करून आता त्यांच्या निष्ठेचे फलित म्हणून त्यांना प्रदेश कार्यकारणीत काम करण्याची संधी दिली आहे.