कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपाला म. रा. ग्रामसेवक संघाचा पाठिंबा; काळया फिती लावून केला निषेध

 कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपाला म. रा. ग्रामसेवक संघाचा पाठिंबा; काळया फिती लावून केला

निषेधाचे सभापतींनी दिले निवेदन

Sampala Maharashtra State Gram Sevak Sangh’s support; Protested with black ribbons

RajendraSalkar।वृत्तवेध ऑनलाईन| Updated: For 27Nov 2020, 18:30

नेवासा : केंद्र सरकारच्या कर्मचारी व कामगार विरोधी धोरणाबाबत (२६) नोव्हेंबर रोजी देशातील कर्मचारी व कामगार यांच्या विविध संघटनांनी संप पुकारला या संपास महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या वतीने निवेदन देऊन पाठींबा देण्यात आला.तसेच काळया फिती लावून निषेध करणार  असल्याचे  निवेदनात म्हटले आहे.

  या संपाच्या पाठिंबा बाबत नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे,उपसभापती किशोर जोजार, गटविकास अधिकारी शेखर शेलार यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकारने कर्मचारी व कामगार धोरणाबाबत देशातील कर्मचारी व कामगार यांच्या विविध संघटनांनी २६/११ रोजी  संप पुकारलेला असून या संपात संघाचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी (कंत्राटी वगळून) सहभागी असून केंद्र सरकारचे कर्मचारी व कामगार विरोधी धोरणांचा निषेध म्हणून काळया फिती लावून दैनंदिन काम कामकाज करणार असल्याचे म्हटले आहे.
नेवासा पंचायत समिती मध्ये निवेदन देतेवेळी छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सुदामराव बनसोडे, संचालक दादासाहेब डौले, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सुनील काळे, रावसाहेब डौले,संचालक पोपटराव वरखडे, अशोक उगले,दिलीप शेळके, आण्णासाहेब डेंगळे,अनुसूयाकुमार उन्हाळे, राजेंद्र मुसमाडे,ज्ञानदेव शिंदे उपस्थित होते.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page