दोन गावठी कट्टे व ११ काडतुसांसह आरोपी जाळ्यात

दोन गावठी कट्टे व ११ काडतुसांसह आरोपी जाळ्यात

Accused nabbed with two village cartridges and 11 cartridges

अवैध हत्यारे वापरणाऱ्यांची माहिती द्या, नावे गुप्त ठेवू, नेवासा पोलिसांचे आवाहन

RajendraSalkar।वृत्तवेध ऑनलाईन| Updated: For 30Nov 2020, 18:30

कोपरगाव : गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह फिरून गावात दहशत पसरविणाऱ्या आरोपीच्या मुसक्या नेवासा येथे पोलिसांनी आवळल्या. आरोपीच्या ताब्यातून दोन गावठी कट्ट्यांसह ११ जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्या आहे. विलास श्रीपती काळे (६५), नजन वस्ती जबलपुर तालुका नेवासा जि. नगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

सबलतपूर येथील विलास काळे हा त्याच्या कमरेला गावठी कट्टा व जिवंत काडतूस घेऊन गावात फिरत आहे. अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक राहुल यादव यांना रविवारी (२९) रोजी दुपारी एक वाजता मिळाली.
सदर बातमी वरून परि भापोसे अभिनव त्यागी प्रभारी अधिकारी नेवासा पोलीस स्टेशन यांच्यासह पोसई भरत दाते, पोना राहुल यादव, महेश कचे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक कुदळे, गणेश इथापे, शाम गुंजाळ, सचिन गणगे व दोन पंच अशांनी सबलतपूर रा गावात जाऊन छापा टाकून विलास श्रीपती काळे रा. नजन वस्ती सबलतपूर ता. नेवासा यास ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये ८० हजार रुपये किमतीची दोन गावठी कट्टे (पिस्तोल)
तसेच साडेपाच हजार रुपये किमतीची ११ जिवंत काडतूस (राउंड) मिळून आले आहेत. सदरचे पिस्तोल विलास श्रीपती काळे यांचा मुलगा पाल्या विलास काळे यांनी खरेदी केलेबाबत तपासात निष्पन्न झाले आहे. सदर प्रकाराबाबत नेवासा पोलीस स्टेशनला आरोपी नामे विलास काळे व पाल्या विलास काळे(फरार) दोघांविरुद्ध पो. ना. राहुल यादव १३७९ यांचे फिर्यादीवरून रजिस्टर नंबर फर्स्ट ९२४/२०२० आर्म अक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडून आणखी गावठी कट्टे मिळण्याची शक्यता आहे.
सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, तसेच परि भापोसे अभिनव त्यागी प्रभारी अधिकारी नेवासा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुर, पोसई प्रदीप शेवाळे, पोसई भरत दाते, पोना राहुल यादव, पोना, महेश कचे, सुहास गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल अशोक कुदळे, गणेश इथापे, शाम गुंजाळ, सचिन गणगे नेवासा पोलीस स्टेशन यांनी केले, असून पुढील तपास पोसई दाते व पोना. संदीप गायकवाड हे करीत आहेत. आणखी हत्यारे सापडण्याची शक्यताअवैध हत्यारे वापरणाऱ्यांची माहिती द्या, नावे गुप्त ठेवू असे आवाहन नेवासा पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page