येसगावात १६ वर्षीय मुलीस मारहाण करून विनयभंग, ३ तीन जणांना अटक

क्राईम
येसगावात १६ वर्षीय मुलीस मारहाण करून विनयभंग, ३ तीन जणांना अटक

Beating of minor girl, molestation

RajendraSalkar,वृत्तवेधऑनलाईन |     Thu 3 Dec 2020, 13:30

कोपरगाव : आमच्या दुकानातील ग्राहकांना आमच्याबद्दल काहीपण सांगतात, असे म्हणुन आरोपींने १६ वर्षीय मुलीस मारहाण करून विनयभंग केला. ही घटना एक दिवसांपूर्वी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास येसगाव परिसरात घडली. याप्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दिलीप कदम, दिपक दिलीप कदम, सचिन दिलीप कदम असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित मुलीने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुटुंबीयासह येसगाव परिसरात राहायला आहे. त्यांच्या शेजारीच आरोपी यांचे दुकान आहे.

बुधवारी (२) एक दिवसांपूर्वी १६ वर्षीय मुलगी घरासमाेर असताना यातील आराेपीत मजकुर हे तेथे आले व म्हणाले की, तुम्ही आमच्या दुकानावर येणारे लाेकांना बाेलावुन आमच्याबद्दल काहीपण सांगतात असे म्हणुन आराेपी दिपक याने फिर्यादीची छाती दाबुन फिर्यादीस लज्जा उत्पन्न हाेईल असे वर्तन करुन फिर्यादीचे गळ्यास नखाने ओरबडुन जखम केली.व फिर्यादीची आई साेडविण्यास आली असता तिला लाकडी दांड्याने मारहाण करुन वाईट वाईट शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
अल्पवयीन मुलीस मारहाण, विनयभंग   आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी संजय सातव उपविभागीय पाेलीस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी तपास सुरु आहे. –कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव

Leave a Reply

You cannot copy content of this page