हळदीच्या कार्यक्रमात राडा; अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, एक जखमी

हळदीच्या कार्यक्रमात राडा; अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, एक जखमी

Fighting stone throwing

RajendraSalkar, वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 1Dec 2020, 15:22

 कोपरगाव : लग्नाच्या हळदी चा कार्यक्रम सुरू असताना टाकळी नाका, बुद्ध विहार  परिसरात सोमवारी  आरोपी यांनी  गैर कायद्याची मंडळी जमून हळदीच्या जेवणाचे कार्यक्रमात दगडफेक केली. रात्री साडे नऊच्या  सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.

 याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,योगीत सुरेश थोरात  (३०)   धंदा घरकाम रा. टाकळी नाका, बुद्ध विहार ता.कोपरगाव यांच्या घरासमोर सोमवारी ३० रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दिराचा  हळदीचा कार्यक्रम चालू असताना यातील आरोपी  दिपक राजेंद्र नाईकवाडे,  अमोल नरेंद्र पॆकले, दशरथ मच्छिन्द्र त्रिभुवन, शरद मच्छिन्द्र त्रिभुवन,  विशाल पिंगळे, विकी सरोदे, अजय दिलीप डावखर, आकाश रोहकले, सचिन साळवे, साईनाथ मच्छिन्द्र त्रिभुवन, गणेश बाबुराव काटे रा. कोपरगांव यांनी गैर कायद्याची मंडळी जमून हळदीच्या जेवणाचे कार्यक्रमात दगडफेक करून स्टील पाइपने मारहाण करून जेवणाच्या भांडणाची मोडतोड करून नुकसान करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यात फिर्यादी योगीत सुरेश थोरात हा जखमी झाला आहे. योगीत थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील ११ आरोपीविरोधात कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये. रजि. नं व कलम  : ८३०/२०२० भादवि कलम ३२४, ३३७, ४२७,१४३, १४७,१४८,१४९, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे मंगळवारी ०२:२८ वाजता  गुन्हा रजि.दाखल करण्यात आला आहे. पोनि गोविंद गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली  पोहेका.१७७७  डि. आर. तिकोने पुढील तपास करीत आहेत. अद्यापपर्यंत आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
1

Leave a Reply

You cannot copy content of this page