उसाच्या बैलगाडीला आयशरची धडक; गाडीवान जखमी तर दोन बैल ठार
Eicher hitting a sugarcane bullock cart; The driver was injured and two bulls were killed
RajendraSalkar,वृत्तवेधऑनलाईन |Thu3Dec 2020, 18:30
कोपरगाव : नगर मनमाड महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या आयशर टेंम्पोने बैलगाडीला धडक दिल्याने गाडीवान उसतोडणी मजूर जखमी झाल्याची घटना घडली असून दोन बैल ही ठार झाले.
आज गुरूवार (३) रोजीला पहाटे साडेचार पावणसहा वाजण्याच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गावर जेऊर कुंभारी शिवारात येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये उस तोडणी करण्यासाठी चार-पाच बैलगाड्या एकामागोमाग कोकणठाण शिवारातील माळवाडी येथील तोडणी अड्ड्यावरून कोपरगावकडे निघाल्या होत्या. गुरुवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगामध्ये आलेल्या टेंम्पोने बैलगाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये बैलगाडीवान विष्णू मदन राठोड रा.चाळीसगाव हा जखमी झाल्याची घटना घडली. तसेच राठोड यांचे दोन्ही बैल ठार झाले आहेत.
याप्रकरणी राजाराम हाटेसिंग राठोड (४०),धंदा-उसतोडणी रा.सेवानगर पोस्ट उपखेड ता.चाळीसगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आयशर टेम्पो क्रं.एम.एच-१२एच.डी२४२२ ह्या वहानावरील चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शैलेंद्र ससाणे तपास करीत आहेत.





