कोपरगाव बाजार समिती संचालक मंडळाची मुदत संपली, प्रशासकाची नेमणूक

कोपरगाव बाजार समिती संचालक मंडळाची मुदत संपली, प्रशासकाची नेमणूक

Term of the Board of Directors expires, appointment of Administrator

RajendraSalkar| वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 7 Dec 2020,20:30:00

कोपरगाव : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत संपल्याने बाजार समितीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सोमवारी आदेश जारी केला, असून प्रशासक पदाचा कार्यभार एन. जी.ठोंबळ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोपरगाव हे  स्वीकारणार.

बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ मिळावी. यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. मात्र, संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत संपली नाही सदर समितीचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नेमणे योग्य राहील असे म्हणत सदर प्रस्ताव फेटाळण्यात आला अखेर प्रशासकाची नियुक्ती करून भाजप काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष असलेल्या विद्यमान संचालकांना दणका दिला.

कोपरगाव बाजार समितीची २०१५ मध्ये निवडणूक झाली होती. मात्र त्यावेळी बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था असल्याने ही निवडणुकीसाठी शेतकऱ्यांची संस्थेचा पैसा खर्च होऊ नये या उदात्त हेतूने बिनविरोध करण्यात आली होती. कोल्हे, काळे, परजणे व औताडे त्यांच्या समर्थकांचे संचालक मंडळ अस्तित्वात आले . त्यानंतर कोल्हे या दोन्ही गटांनी अडीच अडीच वर्षांसाठी आलटूनपालटून सभापती व उपसभापती पदे वाटून घेतली होते.
त्यानंतर काळे गटाचे मधुकर टेके सभापती,तर कोल्हे गटाचे नानासाहेब गव्हाणे उपसभापती झाले होते. त्यानंतर पुढील अडीच वर्षासाठी कोल्हे गटाचे संभाजी रक्ताटे सभापती तर काळे गटाचे राजेंद्र निकोले उपसभापती हे विद्यमान होते. कोल्हे या दोन्ही गटांनी अडीच अडीच वर्षांसाठी आलटूनपालटून सभापती व उपसभापती पदे वाटून घेतली होते.

संचालक मंडळाची १ नोव्हेंबर २०२० रोजी पाच वर्षांची मुदत संपली. महाराष्ट्र कृषी उत्पन्न अधिनियम १९६३ मधील कलम १४ (३)(अ) च्या तरतुदीनुसार राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका २४ जुलै २०२० पासून सहा महिने कालावधीसाठी पुढे ढकलल्या आहेत. परंतु, बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने प्रशासक येणार की संचालकांना मुदतवाढ मिळणार याबाबत तालुक्यात उत्सुकता होती.

संचालक मंडळाचे मुदत वाढवून मिळावी असा प्रस्ताव संचालक मंडळाकडून दाखल करण्यात आला होता परंतु प्रशासन पर्यंत संचालक मंडळाचा पाच वर्षाचा कार्यकाल संपुष्टात आल्याने अशारिस्थितीत प्रशासकाचा मार्फत दैनंदिन कामकाज करणे योग्य राहील त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देणे योग्य होणार नाही असे माननीय कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी कळविले .

या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोपरगाव एन.जी. ठोंबळ यांचे प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचा आदेश जारी केला आहे त्यामुळे ठोंबळ
यांनी प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारला. सहा महिन्याच्या आत नवनिर्वाचित सदस्य मंडळ अस्तित्वात आणावयाचे आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page