साडेसात एकर ऊस जळून खाक… वीज वितरण कंपनीचा भोंगळा कारभार
शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान…
Burn seven and a half acres of sugarcane.
RajendraSalkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 11 Dec 2020, 16 : 00:00
कोपरगाव : तालुक्यातील चांदेकसारे शिवारात कैलास सोपान मते, सुनिता कैलास मते,सोपान गंजी मते यांच्या मालकीचा साडेसात एकर ऊस वीज वितरण कंपनीची मेन लाईटची तार तुटून जळुन खाक झाला. या शेतकऱ्याचे तब्बल दहा लाखांच्या वरती नुसकान झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे परिसरात अनेक ठिकाणी विद्युत खांबावरील तारा लोंबकळत असलेल्या स्वरूपात आहेत.शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी करूनही वीज वितरण कंपनीकडून याची दखल घेतली जात नाही त्यामुळेच परिसरात असे प्रकार घडत आहे. चांदेकसारे गट नंबर 1
१६१/३ मधील साडेसात एकर ऊस काल विद्युत वितरण कंपनीची तार तुटल्यामुळे जळून खाक झाला.
अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकरी हवालदिल झाला. परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्याशी संपर्क साधत अग्निशामक दलाला पाचारण केले. शर्तीचे प्रयत्न केल्यानंतरही ऊस आगीपासून आटोक्यात आला नाही.
मते यांनी २६५ जातीची उसाची लागवड आपल्या साडेसात एकर शेतात केली होती.उसाची नोंद सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यात केली होती.ऐन गळीतास काही दिवस बाकी असतानाच ऊसाला आग लागल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.विज वितरण कंपनीच्या विरोधात नुकसान भरपाई मिळावी म्हणून ते न्यायालयात तक्रार दाखल करणार असल्याचे समजते आहे.
Post Views:
244