सु-याचा धाक दाखवून कोपरगाव शहरात ५ लाख लुटले
5 lakhs were looted in Kopargaon city out of fear of Suya
RajendraSalkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 12Dec 2020, 17:30:00
कोपरगाव : कोपरगाव शहरातील भाई-भाई मोटार गॅरेज याठिकाणी सु-याचा धाक दाखवून ५ लाख रुपायांची रोकड लुटल्याची घटना शुक्रवारी (ता. ११) रात्री १०.२५ वाजण्याच्या सुमारास कोपरगाव येथे घडली. या प्रकाराने पोलिसही चक्रावले आहेत.
या लुट प्रकरणी दिलीप शंकर गौड (वय ३५ वर्षं,व्यापार रा. निवारा) कोपरगाव याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, दिलीप हा व्यापारी रात्री १०:२५ वाजेच्या सुमारास मोटर सायकलवरून
४ लाख ९८ हजार ९००रुपायांची रोकड घेऊन जात असताना भाई भाई मोटर गॅरेज या ठिकाणी येथे दोन शाईन व पल्सरवरुन आलेल्या चौघांनी त्याच्या दुचाकीला दुचाकी आडवी मारुन त्याला थांबविले. वरिल वर्णनाची व किमतीची रोख रक्कम, मोबाईल, टॅब व कागदपत्रे असलेली बॅग ही त्याचे संमतीशिवाय लोखंडी सुऱ्याचा धाक दाखवुन लबाडीचे इराद्याने बळजबरीने चोरुन नेली.
यानंतर ते चौघेही पसार झाले. प्रकारानंतर दिलीप याने कोपरगाव शहर पोलिसात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई. भरत नागरे पुढील तपास करीत आहेत.