नेवासा फाटा घरफोडी; तीस हजारांचा रोकड लंपास
Burglary
RajendraSalkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 12 Dec 2020, 19:30:00 AM
नेवासा :नेवासा फाटा मुंकीदनगर भागात चोरट्यांनी घरफोडी करून ३० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
याप्रकरणी नेवासा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबन बाबुराव पाठक (७१) रिटायर शिक्षक (रा. मुंकीदनगर, नेवासा फाटा ) यांच्या तक्रारीनुसार, पाठक कुटुंबीय ११ डिसेंबर रोजी पाथर्डी येथे मुलीकडे गेले होते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली ३० हजाराची रोकड चोरून नेली. पाठक गुरुजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास नेवासा पोलीस करीत आहेत.