संजीवनीच्या सात विद्यार्थ्यांची कॅप्जेमिनी व विप्रो मध्ये निवड – अमित कोल्हे

संजीवनीच्या सात विद्यार्थ्यांची कॅप्जेमिनी व विप्रो मध्ये निवड – अमित कोल्हे

Selection of seven students of Sanjeevani in Capgemini and Wipro – Amit Kolhe

कोविड १९ च्या काळातही संजीवनीची यशस्वी वाटचाल

RajendraSalkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 14 Dec 2020, 12:30:00

कोपरगांव : संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने अलिकडेच कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत कॅप्जेमिनी टेक्नाॅलाॅजी सर्विसेस इंडिया लिमिटेड (सीटीएसआयएल) या कंपनीने संजीवनीच्या चार तर विप्रो कंपनीने तीन विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली आहे. विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन देवुन पालकांच्या स्वप्नपुर्तीसाठी संजीवनीच्या प्रयत्नांना यश मिळत आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात अमित कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की कोविड १९ च्या काळात संपुर्ण जग या विश्वव्यापक महामारीचा सामना करीत असताना संजीवनीचे संपुर्ण शैक्षणिक संकुलही त्यात सामिल आहे. मात्र अशा संकटातही आपल्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन स्वावलंबी बनविण्यासाठी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आपले सातत्य कायम ठेवुन यश संपादन केले आहे. अलिकडेच झालेल्या कॅम्प्स प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत सीटीएसआयएल या भारतभर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ओंकार विनोद डागा, सायली नंदुु चौधरी , अंकुश अशोक कुमार व स्नेहा दिलीप चिने या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण काळात इतर सोयी सवलतीं बरोबरच वार्षिक रू ३. ८ लाखांचे पॅकेज देवु केले आहे. तर विप्रो या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह इलेक्ट्रिकल व इलेक्ट्राॅनिक्स मालाचे उत्पादन करणाऱ्या आघाडीच्या कंपनीने कावेरी विजय भडांगे, प्रतिक्षा सतीश औताडे व परमेश्वर अंकुश इंगळे यांची सुरूवातीस वार्षिक पॅकेज रू ३. ५ लाख देवुन निवड केली आहे. सर्व पालकांनी कोविड १९ च्या कठीण काळातही त्यांच्या पाल्यांना नोकरी देवुन कुटूंबास आधार दिल्याबध्दल संजीवनीच्या प्रयत्नांसाठी आभार व्यक्त केले.
माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी-विद्यार्थीनी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यायालयाचे डायरेक्टर (प्राचार्य) डाॅ. डी. एन. क्यातनवार यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

You cannot copy content of this page