आवर्तनाच्या तारखा जाहीर नसल्याने शेतकऱ्यांनी पाटपाण्याकडे पाठ फिरविली – संजय काळे
Farmers turn their backs on floodwaters – Sanjay Kale
तळे भरले असले तरीही पुढच्या आवर्तनाची वाट पहात पाणी राखून ठेवणार पालिकेचा अजब निर्णय
RajendraSalkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 23 Dec 2020, 15:30:00
कोपरगाव : पाटबंधारे खात्याने आवर्तने देणार असल्याचे मोघम सांगून आवर्तनाच्या तारखा जाहीर न केल्यामुळे शेतकरी नियोजन करू शकला नाही. त्याने सात नंबर फॉर्म भरला नाही. मुदत वाढवून देखील शेतकऱ्यांनी पाट पाण्याकडून पाठ फिरवली असल्याचा जोरदार आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे.
चारही तळे गच्च भरलेले असताना नगरपालिका व्यवस्थापन म्हणते पुढचे आवर्तन पाटबंधारे विभाग कधी दोणार हे सांगत नसल्यामुळे पाणी सहा दिवस आड द्यावे लागते.उपलब्ध साठा साठ दिवस पुरवायचा आहे. म्हणजे जानेवारी महिन्याचे अखेर तेंव्हा तळे भरले असले तरीही पुढच्या आवर्तनाची वाट पहात पाणी राखून ठेवणार या पालिकेच्या अजब निर्णयाची काळे यांनी खिल्ली उडवली.
संजय काळे म्हणाले, गोदावरी डाव्या तट कालव्याची कालवा सल्लागार समितीची बैठक कोपरगाव शहरात झाली.. बैठकीत माझा आग्रह होता कि पाटबंधारे विभागाने आवर्तने व त्यांच्या तारखा जाहीर कराव्या.. पण त्यांनी रब्बीत एक व उन्हाळ्यात दोन असे आवर्तने जाहीर केलेत पण तारखा जाहीर नाही केल्या नाहीत.
तारखा जाहीर न केल्यामुळे शेतकरी नियोजन करू शकला नाही. त्याने सात नंबर फॉर्म भरला नाही. मुदत वाढवून देखील शेतकऱ्यांनी पाट पाण्याकडून पाठ फिरवली जोरदार आरोप काळे यांनी केला आहे
प्रशासनाने जर तारखाच जाहीर केल्या नाहीत तर मिटींग मुंबईत घेतल्या काय, कि कोपरगावला घेतल्या, शेतकऱ्याला ग्रामपंचायत व नगरपरिषदांना त्याचा काय उपयोग ? बैठकीला मंत्री हजर होता का संत्री त्याचा जनतेला काय फायदा ? असा सवाल उपस्थित करून संजय काळे यांनी तुमच्या मिरवण्यापेक्षा जनतेचाच फायदा केंंद्रस्थानी असावा असा चिमटा त्यांनी काढला आहे. आता लोकप्रतिनिधींनी आवर्तनाच्या तारखा जाहीर कराव्यात आणि पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे प्रश्न मिटवावे अशी मागणी काळे यांनी केली असून धरणात पाणी असून आमचे म्हणजे जनतेचे हाल करू नये. असा सल्ला संजय काळे यांनी शेवटी दिला आहे.





