कोपरगावचा पारा सात अंशावर
Kopargaon’s mercury at seven degrees
RajendraSalkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 22 Dec 2020, 20:30:00
कोपरगाव: निफाड नाशिक येथे कालचा पारा सहा की आठ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरलो आहेत त्यामुळे कोपरगाव शहरातही आज पहाटेपासून थंडीची मोठी लाट आली होती काही भागात धोकेही पडले होते सायंकाळनंतर थंडीचा गारवा अधिकच वाढू लागला असल्याने उधार स्वेटर शाल मफलर कानटोपी कपाटातून बाहेर आले आहेत कोपरगाव चा पाराही सात अंशावर स्थिरावला आहे तशी नोंद जेऊर कुंभारी येथील हवामान केंद्रावर झाली असल्याची माहिती प्रभारी हवामान निरीक्षक चेतन प-हे यांनी दिली.
राज्यभर कडाक्याची थंडी धूके पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिल्याने तसेच जम्मू काश्मीर लडाख आधी ठिकाणीही बर्फ पडत असल्याने थंडीची लाट आली आहे यावर्षीही ही सर्वांत नीचांकी नोंद हवामान केंद्रावर झाली आहे नागरिक सर्वसामान्य लोक मुले शेकोट्या करून थंडीपासून बचाव करीत आहेत गेले चार-पाच दिवस ढगाळ वातावरण होते त्यामुळे थंडी गायब झाली होती ढगाळ वातावरणाचा फटका पिकांवर बसला असून अनेक रोग पसरले आहेत थंडीची लाट येत्या चार दिवसात अधिक तीव्र होणार असल्याची असल्याचा इशारा हवामान शास्त्र विभागाने दिला असून अनेक ठिकाणी तापमान पाच अंशापर्यंत आले आहे रविवारपासून ही लाट आली आहे या गुलाबी थंडीत नागरिक महिला तरुण सायकलवर फिरण्याचा आनंद घेत आहे शरीराला पौष्टिक खुराक म्हणून खारीक खोबरे बदाम काजू आदी वस्तूंची दुकाने शहरात थाटली आहे त्यापासून बनवलेले साजूक तुपातील लाडू खाण्यावर भर दिला जात आहे अधिक धोरणामुळे जास्त असलेले लोक थंडीमुळे बाहेर पडण्यास धजावत नाही सायंकाळी सात नंतर शहरात अघोषित संचारबंदी सारखे वातावरण दिसते ऊबदार स्वेटर मफलर स्वेटर ब्लॅंकेट दुलई रग घेण्यासाठी शहरातील रस्त्यावर छोट्या व्यावसायिकांकडे झुंबड उडाली आहे गोदावरी नदीवरील बंधारे तुडुंब भरले असून त्यामुळे गोदावरी ही नदी पट्ट्यावर थंडी अधिक जाणवत आहे तरीही कोपरगावला सहा दिवसांआड पाणी पुरवले जात आहे. ता .२१ सोमवार पासून तिव्र थंडीची लाट येणार! पण संपूर्ण हिवाळा धुई/ धूके सोबत संघर्ष करावा लागणार!पंजाब डख
🟣 माहितीस्तव
उत्तरे कडील थंड वारे उद्या रात्री पासून वाहू लागतील त्यामुळे सोमवार पासून थंडीत वाढ होणार आहे . व तसेच धुई , धूके संपूर्ण हिवाळा संघर्ष करावा लागेण . फक्त जाळे धुई आल्यावर नुकसाण होते . पण जाळे धुई पाउस बंद होणार असल्या नतंर दुसर्या दिवसी येते . पण पाउस महिण्यातून एकदा राज्यातील एखाद्या भागात असणार . त्यामुळे धुई /धुके वातावरणात राहणार . सर्वात जास्त जाळे धुईचा पिकांना फटका बसतो . पिक वाचविण्यासाठी धुके आल्या नतंर धूर करणे किवां पाण्याचा पिकांवर फवारा करणे नसता शेवटी बुरशीनाशक फवारणी करण्याची तयारी ठेवावी . जेणे करूण आपले पिक वाचेल . असो -पंजाब डख._
🟣 सोयाबिन बियाण्या साठी तसेच तिळ . भूईमुग . टरबुज खरबुज . आलू .पेरणी करण्यास पोषख वातावरण धूई,/धूराळे/धूके पासून पिकांचे सरक्षंण करा._
🔵 २१ तारखेपासून थंडीला सुरवात होइल राज्यात दिवसा ढगाळ वातावरण रात्री थंडी असणार ._
🟣 वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .
🟣 दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.*_ असे
पंजाब डख_
हवामान अभ्यासक रा. कि .संस्था महाराष्ट्र राज्य गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी (मराठवाडा )_ यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.
Post Views:
634





