आर्थिक फसवणूक प्रकरणी पोस्ट मास्तर विरूध्द गुन्हा ; चार दिवसाची पोलीस कोठडी
Financial fraud
RajendraSalkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 23 Dec 2020, 18:30:00
कोपरगाव : बनावट नोंदी सह्या करून खातेदारांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून तसेच खातेदाराकडून खात्यामध्ये पैसे घेऊन सरकारी खात्यात जमा न करता स्वतःच्या वैयक्तिक फायदा करिता वापर केल्याप्रकरणी पोस्ट मास्तरवर कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की १ सप्टेंबर २०१७ ते दिनांक ३० सप्टेंबर २०१९ रोजी चे दरम्यान पोस्ट ऑफिस धारणगाव तालुका कोपरगाव येथे तात्कालिक लोकसेवक आरोपी रवींद्र बाळासाहेब जाधव रा. बोलकी पोस्ट करंजी ता.कोपरगाव याने धारणगाव पोस्ट ऑफिस मध्ये पोस्ट मास्तर या पदावर कार्यरत असताना बनावट नोंदी सह्या करून खातेदारांच्या खात्यातून ४०२०० परस्पर पैसे काढून तसेच खातेदाराकडून खात्यामध्ये पैसे घेऊन सरकारी खात्यात जमा न करता स्वतःच्या वैयक्तिक फायदा करिता वापर केला. या प्रकरणी विनायक सोन्याबापू शिंदे (३८) धंदा नोकरी (डाक निरीक्षक) कोपरगाव उपविभाग रा. नाऊर तालुका श्रीरामपूर यांनी २१ डिसेंबर २०२० रोजी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार सशयितांवर .गु. र.न. ५५८/२०२० भा द वी कलम ४२०,४०९, ४६८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे करीत आहेत.