कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल

कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल

जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल

कोपरगाव :
सोयाबीनची उगवण क्षमता कमी असताना देखील उगवण क्षमता अधिक असल्याचे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करून निकृष्ट दर्जाचे बियाणे वितरण केल्या प्रकरणी जालना येथील कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापकावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. दगडू नानाभाऊ अंभोरे असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरीप हंगामात शेतकऱ्यांना पेरणीची घाई असते. आशा वेळी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या जिल्ह्यात अवतरतात आणि शेतकऱ्यांना आपली बियाणे चांगली असून अधिक उगवण शक्ती असल्याच्या थापा मारतात यात शेतकरी बळी पडतो. अशाच एका साई कम्प्युटर नववा मजला सेनापती बापट रोड जे. डब्ल्यू. मेरीयट हॉटेल समोर, शिवाजीनगर पुणे येथे मुख्य कार्यालय असलेली ही उत्पादक कंपनी आहे .

कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड जालनाचे व्यवस्थापक दगडू नानाभाऊ अंभोरे व यांनी ५ जून ते २० जून या कालावधीत संवत्सर, कान्हेगाव, ओगदी व इतर गावच्या शिवारात कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड , जालना या कंपनीचे के. एस. एल. ४४१ सोयाबीन बियाणे आणुन आमच्या कंपनीचे सोयाबीन उगवण क्षमता कमी असतानाही उगवण क्षमता जास्त असल्याचे दाखवून निकृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून पोबारा झाले.

 

इकडे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात अंकुर सोयाबीनचे सिडसची पेरणी करून देखील बियाणे १० ते २० टक्के उतरले आजपर्यंत पुर्ण उगवले नसल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठून आपली कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड, जालना कंपनीने फसवणूक केल्याची कैफियत मांडली. त्यानंतर तालुका अधिकारी अशोक आढाव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या पेरलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली असता बियाणे उगवल्याचे दिसून आले नाही.

त्यामुळे तालुका कृषी अधिकारी अशोक यादवराव आढाव यांच्या फिर्यादी वरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात ४२० फसवणुकीचा तसेच बियाणे कायदा प्रमाणे कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापक दगडू नानाभाऊ अंभोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनी विरुद्ध हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला अटक केली नसून पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. ई. सचिन इंगळे पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page