कोरोना: आवागमन टाळा तहसीलदार योगेश चंद्रे यांचे आवाहन

कोरोना: आवागमन टाळा तहसीलदार योगेश चंद्रे यांचे आवाहन

कोपरगाव :
ग्रामीण व शहरी भागातील सर्व लोकांना covid-19 अनुषंगाने परत सूचना आहे की मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक या ठिकाणावरून आलेल्या लोकांना गावांमध्ये घेऊ नका किंवा घेतल्यास त्यांना शाळेमध्ये किंवा ज्या ठिकाणी सांगितलेले आहे त्या ठिकाणी ठेवावे. कोणत्याही व्यक्तीने आपल्या नातेवाईकांना गावाकडे बोलावू नये. पुढील काही दिवस अत्यंत धोक्याचे असून आपणही बाहेरगावी जाण्याचे टाळावे आणि आपल्या पाहुण्यांना सुद्धा आपल्या गावांमध्ये न येण्यासाठी सूचित करावे.

सद्य परिस्थितीमध्ये covid-19 चा प्रसार हा बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे किंवा आपल्याकडचे लोक जे बाहेर गावी जाऊन येतात त्यांच्यामुळे होताना दिसत आहेत त्याच्यामुळे सर्व नागरिकांनी स्वतःची जबाबदारी असल्यासारखे वागून एक तर बाहेर जाऊ नये किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांना आपल्याकडे बोलावून नये. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपली जबाबदारी अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागून आपण आपले कुटुंब आपले गाव आणि आपला तालुका करोना मुक्त कसा राहील त्याच्या अनुषंगाने प्रयत्न करायचा आहे. घरी राहा सुरक्षित राहा आणि सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा असेही शेवटी त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page