शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त तसेच कानिफनाथ मढी देवस्थानचे अध्यक्ष व माजी विश्वस्त जेष्ठ पत्रकार अशोक खांबेकर यांचे निधन.
Senior journalist Ashok Khambekar passes away.
RajendraSalkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 25 Dec 2020, 17:00:00
कोपरगाव : शिर्डी संस्थानचे विश्वस्त तसेच श्री क्षेत्र कानिफनाथ मढी येथील देवस्थानचे अध्यक्ष माजी विश्वस्त व नामदेव शिंपी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जेष्ठ अधिस्वीकृती पत्रकार अशोक भिमाशंकर खांबेकर (वय-६५) यांचे आज दुपारी दोन वाजता नाशिक येथे अशोका रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू असताना निधन झाले आहे.त्यांच्या मागे पत्नी मीनल स्वरूप व स्वप्निल ही दोन मुले शितल व स्नेहल या दोन मुली नातू असा परिवार आहे. अशोक खांबेकर यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर कोपरगाव अमरधाम मध्ये शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले अशोक खांबेकर हे काँग्रेसचे पक्षाचे खंदे समर्थक होते. शिर्डी संस्थान विश्वस्त पदी गेली २३ वर्ष श्री क्षेत्र कानिफनाथ मढी व्यवस्थांचे अडीच वर्ष अध्यक्ष तू पाच वर्ष विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले होते त्यांनी महाराष्ट्र राज्यभर पत्रकारितेत मोठे योगदान दिले.ते पी.टी. आय. तसेच यु एन आय चे पत्रकार म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले रेडियो व दूरदर्शन वरही ते ठळक बातम्या देत असत. देश व राज्य पातळीवर रेल्वे व विविध समित्यांवर ते कार्यरत होते शिर्डी संस्थान च्या माध्यमातून त्यांचा जगभरातील लोकांशी जवळून संपर्क आला होता त्यांची स्मरणशक्ती अतिशय तल्लख होती एखाद्याची ओळख मैत्री झाली ती शेवटपर्यंत कशी टिकवायची हा त्यांचा हातखंडा होता. बातम्या कशा काढायच्या समोरच्या व्यक्तीला कसे बोलते करायचे हे त्यांच्याकडून शिकण्याचा दोघे होते अनेक साईभक्त त्यांना भेटत त्यावेळी ते आपण कधी भेटलो होतो त्याची तारीख वार वेळ मोबाईल क्रमांक अचूक सांगत असे त्यामुळे समोरच्या व्यक्तीला अचंबित पणे वाटत अनेकांची कौटुंबिक नावे राज्यभरातील मतदारसंघ तेथे कोण आमदार खासदार आहेत याबाबतची इत्थंभूत माहिती त्यांना मुखोद्गत पाठ होती मोबाईल क्रमांक ,नातेगोते,अधिकारी त्यांचे पद यांचे ते चालते-बोलते गुगल व्यासपीठ होते स्ट्रॉंग मेमरी असलेले अशोक खांबेकर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांच्या परिचयाचे होते . अनेक आजी-माजी मुख्यमंत्र्यांपासून केंद्रातील व राज्यातील मंत्री राज्यपाल वरिष्ठ पातळीवरील अधिकारी यांच्याशी त्यांचा जवळून व अत्यंत सलोख्याचे संबंध होते त्यांना महिना भरा पूर्वी कोरोनाची लागण झाली होती.त्यांना आधीच मधुमेह रक्तदाब किडनी डोळ्याचा विकार आदी व्याधी निर्माण झाल्या होत्या त्यातच त्यांना कोरोना ने गाठले महिनाभर चे मृत्यूशी झगडत होते अधिक उपचारासाठी त्यांना नाशिक अशोका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते गेल्या चोवीस दिवसापासून ते व्हेंटिलेटरवर होते उपचार सुरू असताना त्यांची प्रतिकार शक्तीने साथ न दिल्याने आज नाशिक येथे त्यांनी आज दुपारी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधना बद्दल आमदार राधाकृष्ण विखे खासदार सुजय विखे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी चे अध्यक्ष बिपीन कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, नगराध्यक्ष विजय वहाडणे शिवसेना नेते राजेंद्र झावरे ,कैलास जाधव ज्येष्ठ पत्रकार सुरेश रासकर, सीबी गंगवाल, राजेंद्र सालकर, महेश जोशी, वीरेंद्र जोशी आजी-माजी विश्वस्त आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे
चौकट
ज्येष्ठ पत्रकार खांबेकर यांचा वाढदिवस चार जानेवारीला असायचा 2021 चा येणारा वाढदिवस होण्याच्या नऊ दिवस अगोदरच देवाची आज्ञा झाल्याने ते इहलोकीचा प्रवासाला गेले अनेकांना त्यांची हूरहूर लागून राहील