धक्कादायक ! रस्त्याच्या वादातून शेतकऱ्याचा खून; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धक्कादायक ! रस्त्याच्या वादातून शेतकऱ्याचा खून; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Farmer’s murder

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 30 Dec 2020, 18:00:00

नेवासा : तालुक्यातील गोधेगाव येथे वादात असलेल्या रस्त्यावर मुरूम टाकला होता. जाण्यायेण्याची अडचण होत असल्याने मुरूम पसरविण्याच्या वादातून सोमवारी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास शेतक-याचा खून झाला. याप्रकरणी ३० डिसेंबरला दुपारी १६:२३ नेवासा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी मयता चा भाऊ ज्ञानेश्वर लक्ष्मण ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुपेंद्र महेंद्र भिंगारदे, अक्षय महेंद्र भिंगारदे, महेंद्र गुलाब गुलाबराव भिंगारदे, कोमल धर्मराज भिंगारदे, राजेंद्र वसंतराव भिंगारदे या पाचजणाविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.

या वादाच्या पार्श्वभूमीवर २९ डिसेंबर रोजी रस्त्यावर महेंद्र महेश उर्फ महेंद्र गुलाबराव फिल्म भिंगारदिवे यांनी मुरमाचे ढंपरखाली केले होते. त्यामुळे रस्त्यावर जाण्या-येण्यासाठी अडचण होत होती. म्हणून ट्रॅक्टरच्या केनिने ते मुरुमाचे ढीग पांगवत असताना शेतकरी दत्तात्रय लक्ष्मण ठोंबरे (वय ४२) यांच्या डोक्यात कु-हाड मारून ठार केल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वादात असलेल्या रस्त्यावर आरोपी यांनी मुरूम टाकलेला असल्याने येणे-जाणे करिता अडथळा निर्माण होत असल्याने फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ दत्तात्रय लक्ष्मण ठोंबरे हे मुरूम पसरविण्याचे काम करीत असताना आरोपी यांनी गैर कायद्याची मंडळी एकत्रित येऊन हातात कुर्‍हाड, काठी घेऊन तुम्ही हे मरूमाचे गंज पांगू नका हा मुरूम आम्ही टाकलेला आहे. असे म्हणून शिवीगाळ करून आरोपी क्रमांक ४ हिने सोबत असणाऱ्या लोकांना यांचा कालचा माज जिरला नाही यांचा एक एकाचा काटा काढा असे म्हणाली, त्यावेळी तिचे बरोबर असलेले आरोपी २,३, व ५ अशांनी दत्तात्रय ठोंबरे यास पकडुन खाली पाडून आरोपी १ याने हातातील कु-हाडीने दत्तात्रय याच्या डोक्यात मारून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारले आहे.

याप्रकरणी मयता चा भाऊ ज्ञानेश्वर लक्ष्मण ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुपेंद्र महेंद्र भिंगारदे, अक्षय महेंद्र भिंगारदे, महेंद्र गुलाब गुलाबराव भिंगारदे, कोमल धर्मराज भिंगारदे, राजेंद्र वसंतराव भिंगारदे या पाचजणांविरोधात नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ९७८/२०२० भादवि कलम ३०२, ३४१,१४१,१४३, १४७,१४८,१४९,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविला असून उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके श्रीरामपूर भाग चार्ज शेवगाव भाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवासा पोलीस स्टेशन व्हि.डी.ठाकूर हे करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page