कोपरगाव २९ ग्रामपंचायतीच्या २७९ जागेसाठी ९९६ अर्ज
Gram Panchayat Election
संवत्सर ग्रामपंचायत उच्चांकी ११७ अर्ज तर देर्डे चांदवड निच्चांकी २० अर्ज
कोपरगांव : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या उमेदवार अर्ज भरणे प्रक्रीयेच्या शेवटच्या दिवशी ५४० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून २७९ जागेसाठी एकुण ९९६ अर्ज प्राप्त झाले यात ४७३ पुरुष तर ५२३ महिला उमेदवार अर्ज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.
संवत्सर ग्रामपंचायत उच्चांकी ११७ अर्ज तर देर्डे चांदवड निच्चांकी २० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
२३ डिसेंबर – राज्य निवडणूक आयोगाचे आदेशानुसार ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील उक्कडगाव ३८ ( पुरुष-२०,स्री-१८ ), तिळवणी २१ ( पुरुष-०८ ,स्री-१३ ), अंजनापुर २८ ( पुरुष-११,स्री-१७ ), घारी ३४ ( पुरुष-१७,स्री-१७ ), मनेगाव २५ ( पुरुष-१२ ,स्री-१३ ), मळेगाव थडी ३६ ( पुरुष-१५,स्री-२१ ), सांगवी भुसार ३२ ( पुरुष-१५ ,स्री-१७ ), वेळापूर ३२ ( पुरुष-१७ ,स्री-१५ ), जेऊर पाटोदा ३४ ( पुरुष-१६ ,स्री-१९ ), काकडी म.३६ ( पुरुष-२०,स्री-१६ ),नाटेगांव २१ ( पुरुष-१०,स्री-११ ), कासली २५ ( पुरुष-०९ ,स्री-१६ ), ओगदी २२ ( पुरुष-०९ ,स्री-१३ ), अंचलगाव २३ ( पुरुष-१०,स्री-१३ ), कोळगाव थडी ५८ ( पुरुष-३१,स्री-२७ ), मायगाव देवी २७ ( पुरुष-१४,स्री-१३ ), हिंगणी २७ (पुरुष-१२,स्री-१५ ), रवंदे २७ ( पुरुष-१३,स्री-१४ ), संवत्सर ११७ ( पुरुष-६३,स्री-५४ ), देर्डे चांदवड २० ( पुरुष-१०,स्री-१० ), मढी खुर्द ३० ( पुरुष-१४,स्री-१६ ), मढी बुद्रुक ३३ ( पुरुष-१५,स्री-१८ ), धोंडेवाडी ३१ ( पुरुष-०९,स्री-२२ ), सोनारी २१ ( पुरुष-०९ ,स्री-१२ ), आपेगाव ३४ ( पुरुष-१६,स्री-१८ ), येसगाव ३६ ( पुरुष-१३,स्री-२३ ), टाकळी ३५ ( पुरुष-२१,स्री-१४ ), कोकमठाण ५८ ( पुरुष-२९,स्री-२९ ), जेऊर कुंभारी ३५ ( पुरुष-१५, स्री-२० ) याप्रमाणे एकूण ९९६ अर्ज दाखल झाले आहे.
२९ ग्रामपंचायतीत दाखल झालेल्या अर्जाची छाननी उद्या दि.३१ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता होत असून या प्रक्रिये करिता निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे उपस्थित राहणार आहे.
तसेच सोमवारी ४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली आहे. ४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजेनंतर चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान शुक्रवारी १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत राहणार आहे.
मतमोजणी सोमवारी १८ जानेवारी २०२१ रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे सकाळी १०:०० वाजेपासून सुरू होईल. अशी माहिती कोपरगाव तहसीलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आहे.सदर निवडणूक प्रक्रिया कामी निवडणूक शाखा अधिकारी अरुण रणनवरे यांचे सह विविध खातेनिहाय कर्मचारी सहाय्य करीत आहेत .