कोपरगाव २९ ग्रामपंचायतीसाठी ९६३ उमेदवार रिंगणात; छाननीत बारा अर्ज बाद- योगेश चंद्रे

कोपरगाव २९ ग्रामपंचायतीसाठी ९६३ उमेदवार रिंगणात; छाननीत बारा अर्ज बाद- योगेश चंद्रे

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 31 Dec 2020, 19:30:00

कोपरगांव : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या उमेदवार अर्ज छाननी प्रक्रीयेत उमेदवारी दाखल एकुण ९७५ अर्जा पैकी ९६३ अर्ज वैध झाले असून १२ अर्ज अवैध झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.छाननी प्रकिया वेळी राज्य निवडणूक आयोग नियुक्त निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे उपस्थित होत्या.

२३ डिसेंबर – राज्‍य निवडणूक आयोगाचे आदेशानुसार ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्‍यात आलेला आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकुण ९७५ दाखल अर्जाची छाननी आज संपन्न झाली. या ग्रामपंचायतीत उक्कडगाव (प्राप्त अर्ज -३८,वैध अर्ज-३८, अवैध अर्ज-००) , तिळवणी(प्राप्त अर्ज -२१,वैध अर्ज-२१, अवैध अर्ज-००), अंजनापुर(प्राप्त अर्ज -२८,वैध अर्ज-२७, अवैध अर्ज-०१), घारी(प्राप्त अर्ज -३४,वैध अर्ज-३४, अवैध अर्ज-००), मनेगाव(प्राप्त अर्ज -२५,वैध अर्ज-२५, अवैध अर्ज-००), मळेगाव थडी(प्राप्त अर्ज -३६,वैध अर्ज-३६, अवैध अर्ज-००), सांगवी भुसार(प्राप्त अर्ज -३२,वैध अर्ज-३१, अवैध अर्ज-०१), वेळापूर(प्राप्त अर्ज -३२,वैध अर्ज-३१, अवैध अर्ज-०१), जेऊर पाटोदा(प्राप्त अर्ज -३५,वैध अर्ज-३४, अवैध अर्ज-०१), काकडी म.(प्राप्त अर्ज -३७,वैध अर्ज-३७, अवैध अर्ज-००),नाटेगाव(प्राप्त अर्ज -२१,वैध अर्ज-२१, अवैध अर्ज-००), कासली(प्राप्त अर्ज -२५,वैध अर्ज-२५, अवैध अर्ज-००), ओगदी(प्राप्त अर्ज -२२,वैध अर्ज-२२, अवैध अर्ज-००), आंचलगाव(प्राप्त अर्ज -२३,वैध अर्ज-२२, अवैध अर्ज-०१), कोळगाव थडी(प्राप्त अर्ज -३६,वैध अर्ज-३६, अवैध अर्ज-००), मायगाव देवी(प्राप्त अर्ज -२७,वैध अर्ज-२७, अवैध अर्ज-००), हिंगणी(प्राप्त अर्ज -२७,वैध अर्ज-२७, अवैध अर्ज-००), रवंदे(प्राप्त अर्ज -२७,वैध अर्ज-२६, अवैध अर्ज-०१), संवत्सर(प्राप्त अर्ज -११६,वैध अर्ज-११६, अवैध अर्ज-००), देर्डे चांदवड(प्राप्त अर्ज -२०,वैध अर्ज-१९, अवैध अर्ज-०१), मढी खुर्द(प्राप्त अर्ज -३०,वैध अर्ज-३०, अवैध अर्ज-००), मढी बुद्रुक(प्राप्त अर्ज -३३,वैध अर्ज-३२, अवैध अर्ज-०१), धोंडेवाडी(प्राप्त अर्ज -३१,वैध अर्ज-३१, अवैध अर्ज-००), सोनारी(प्राप्त अर्ज -२१,वैध अर्ज-२१, अवैध अर्ज-००), आपेगाव(प्राप्त अर्ज -३४,वैध अर्ज-३४, अवैध अर्ज-००), येसगाव(प्राप्त अर्ज -३६,वैध अर्ज-३४, अवैध अर्ज-०२), टाकळी(प्राप्त अर्ज -३५,वैध अर्ज-३४, अवैध अर्ज-०१), कोकमठाण(प्राप्त अर्ज -५८,वैध अर्ज-५८, अवैध अर्ज-००), जेऊर कुंभारी(प्राप्त अर्ज -३५,वैध अर्ज-३४, अवैध अर्ज-०१) याप्रमाणे उमेदवार अर्ज वैध आणि अवैध करण्यात आले आहे. २९ ग्रामपंचायतीत दाखल झालेल्या अर्जाची छाननी नंतर शुक्रवार दि.०१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता निवडणूक प्रक्रियेतील समाविष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच सोमवारी ४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली आहे. ४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजेनंतर चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान शुक्रवारी १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत राहणार आहे. मतमोजणी सोमवारी १८ जानेवारी २०२१ रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे सकाळी १०:०० वाजेपासून सुरू होईल. अशी माहिती कोपरगाव तहसीलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आहे.सदर निवडणूक प्रक्रिया कामी निवडणूक शाखा अधिकारी अरुण रणनवरे यांचे सह विविध खातेनिहाय कर्मचारी सहाय्य करीत आहेत 

Leave a Reply

You cannot copy content of this page