डाॅ. हेडगेवारांचा सेवाभाव पतसंस्था कार्यातून प्रगट व्हावा – नळकांडे
नेवासा – परम पूज्य डॉ. हेडगेवार जीवनभर सेवाभावी वृत्तीने जीवन जगले, पतसंस्थांनी हाच सेवाभाव जपत वेगवेगळे उपक्रम राबवून संस्थांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह अनंतराव नळकांडे यांनी डॉ. हेडगेवार पतसंस्थेच्या सन. २०२१ या दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी केले
यावेळी नळकांडे पुढे म्हणाले, ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून पतसंस्था चळवळीने समाजातील दुर्बल घटकासह सर्वानच पत
मिळवून देण्यासाठी मोठे कार्य केले आहे. या पुढच्या डिजीटल युगात संस्थांच्या ठेवीदार , कर्जदारांसह सर्वच घटकांना या नव तंत्रज्ञानाचा अर्वजून स्विकार करावा लागणार आहे. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुरेशराव नळकांडे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली तर संस्थेच्या व्हाईस चेअरमन सौ. मीनाताई परदेशी यांनी सर्वांचे स्वागत केले तर संस्थेच्या कशियर सौ कावेरी नाबदे यांनी संस्था विषयी माहिती दिली याप्रसंगी शहरातील जेष्ठ व्यापारी अरविंदशेठ मापारी , शंकरराव नळकांडे कृष्णा डहाळे, अशोक ताके, राजेंद्र मापारी,डॉ महेश गायके, विवेक नळकांडे , यांचेसह अशोक केने,गोपाळ बडवे,मनोज देव, राम सचदे,सौ कल्याणी देव, मोहन खराडकर
उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे संचालक शाम मापारी, प्रवीण मापारी यांनी सर्वांचे आभार मानले.