आत्मा मालिक रूग्णालयात मेडिकल डायरेक्टर म्हणून डॉक्टर अनिल माने रुजू
Dr. Anil Mane has been appointed as the Medical Director of Atma Malik Hospital
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 1 Jan 2021, 19:30:00
कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक रुग्णालयात नवीन वर्षापासून मेडिकल डायरेक्टर म्हणून डॉक्टर अनिल माने हे नव्याने रुजू झालेले असून जवळपास २५ विविध डिग्री त्यांच्याकडे आहेत अत्यंत हुशार व अनुभवी असे ते डॉक्टर असून अमेरिकेसह पंधरा विविध देशातून तसेच विविध संस्थेतून त्यांनी उत्तम प्रकारे सेवा दिली आहे अशी माहिती रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी अमित फरताळे यांनी सांगितले.
डॉक्टर माने हे हार्ट अटॅक आलेल्या रुग्ण चालताना धाप लागणे छातीत धडधड होणे छाती दुखणे फुफ्फुसांचे आजार मेंदूचे आजार ऍसिडिटी व पित्ताशयाचे आजार साखरेचे आजार लकवा भरणे फेपरे येणे अर्धांगवायु मुतखड्याचे आजार सर्पदंश झाल्यावर त्यावर विविध उपचार मिरगी येणे डायलेसीस रोड एक्सीडेंट आदी आजारावर प्रख्यात तज्ञ डॉक्टर अनिल माने हे रुग्णांना मार्गदर्शन उपचार करणार आहेत आत्मा मालिक रूग्णालयात हृदयरोग विभाग बालरोग विभाग युरो सर्जरी विभाग जनरल सर्जरी विभाग अस्थिरोग विभाग आदी सर्व विभाग महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अंतर्गत मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळे व केशरी रेशन कार्ड आधार कार्ड रुग्णाला घेऊन यावे लागेल तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक रुग्णालयात नवीन वर्षापासून अत्यंत अनुभवी डॉक्टर माने हे रूग्णांसाठी उपलब्ध असतील . ते म्हणाले आता नवीन वर्षापासून आत्मा मालिक रूग्णालयात रुग्णांना कमी खर्चात चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत विविध उपचारासाठी आधुनिक यंत्रणा येथे बसवण्यात आली आहे. नाशिक येथील एवर हेल्दी हॉस्पिटल आत्मा मालिक रुग्णालय चालवण्यासाठी घेतले आहे येथे आधुनिक सोयी सुविधा रुग्णांसाठी विविध सेवा कार्यान्वित आहेत गेल्या दीड वर्षापासून तालुक्यातील तसेच तालुक्यात बाहेरील रुग्णांना येथे अल्पदरात उपचार केले जात असून त्यात नवीन वर्षात आधुनिक पद्धतीने तसेच उत्तम प्रकारे सेवा मिळावी हा हेतू ठेवून डॉक्टर माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या अधिपत्याखाली आता रुग्णालयाचे प्रशासन चालवले जाणार आहे.
आत्मा मलिक रुग्णालयातअल्प दरात ॲन्जिओग्राफी,मोफतॲन्जिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया गुणवत्तापूर्ण हृदय उपचार जंतुसंसर्ग मुक्त हॉस्पिटल अद्ययावत अतिदक्षता विभाग स्वतंत्र हृदयशस्त्रक्रिया विभाग निर्जंतुक वातावरणामध्ये उपचार २४ x ७ अनुभवी हृदय उपचार तज्ञ रुग्णांच्या शेती सेवेसाठी उपलब्ध आहेत असेही शेवटी श्री फरताळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Post Views:
453





