खेळातुन मिळणारी खिलाडूवृत्ती जीवनाला कलाटणी देते – नितिनदादा कोल्हे
The sportsmanship of the game turns life upside down – Nitindada Kolhe
सहकार महर्षि शंकरराव कोल्हे साहेब चषक
कोपरगांव: खेळाने व्यायाम होतो. खेळातील शिस्त जीवनाला कलाटणी देते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तेथे आपल्या एकट्याचा विचार करून चालत नाही. संपूर्ण संघाचा विचार करावार लागतो. खेळात मनाची एकाग्रता साधता येते. खेळ म्हटले की यश अपयश आलेच. कधी हार होणार, कधी जीत होणार. पण हारही हसत स्वीकारली पाहीजे. हरणारा खेळाडू जिंकलेल्या खेळाडूचे प्रथम अभिनंदन करतो. खेळातुन येणारी ही खिलाडूवृत्ती जीवनाला कलाटणी देते, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी राज्य स्तरीय सहकार महर्षि शंकरराव कोल्हे साहेब चषक अंतर्गत खुल्या टेनिसबाॅल क्रिकेट स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभात केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त व संजीवनी फाऊंडेशनचे सचिव सुमित कोल्हे व मित्र परीवराच्या वतीने संजीवनी सैनिकी स्कूल व तालुका क्रीडा संकुल मैदान, खिर्डी गणेश येथे क्रिकेट स्पर्धां पार पडल्या. कृषि तज्ञ सुरेश कोल्हे हे प्रमुख पाहुणे होते व त्यांच्या हस्ते विजेत्या संघाना रोख बक्षिसे, चषक व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सुमित कोल्हे, उपसरपंच चंद्रकांत चांदर, शिंगणापूर सरपंच श्री भिमाभाऊ संवत्सरकर, अँड. संचेती उपस्थित होते. सदर स्पर्धांसाठी राज्यभरातुन ६० संघातील ७५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. पाच दिवसात एकुण ५१ सामने खेळले गेले. यावेळी सुमित कोल्हे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी तालुका क्रीडा संकुलाची उभारणी केली. कोपरगांव तालुक्यातील खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यांना व्यासपीठ व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी उचलुन संजीवनी क्रिकेट अकॅडमीची स्थापना करून राष्ट्रीय खेळाडू घडविण्याची वाटचाल सुरू करीत आहोत. लवकरच आय.पी.एल.च्या धर्तीवर कोपरगांव प्रिमिअर लिग सुरू करून तालुक्यातील खेळाडूंना सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येतील. सध्या उपलब्ध असलेला व भविष्यात मिळणारा चार-पाच कोटींचा निधी तालुका क्रीडा संकुल येथेच वापरून अद्यावत स्टेडियमची उभारणी करण्यात यावी अशी मागणी करून खेळाडूंच्या प्रगतीसाठी संजीवनी फाऊंडेशन सर्वोतोपरी पुढे राहील, असे आश्वासन त्यांनी प्रशासनास दिले. अंतिम सामन्यात मयूरेश्वरी प्रतिष्ठाण , शिंगणापूर प्रथम क्रमांकाचे रू ३१,००० चे बक्षिस व चषक मिळविले. फ्रेंडस् क्लब कोपरगाव हा उपविजेता संघ ठरला. या संघाने रू २१,००० चे रोख बक्षिस मिळविले. निफाड तालुक्यातील खेडले झुंगे येथिल साई गोविंद संघाने रू ११,००० चे तिसरे बक्षिस जिंकले. एस.के. इलेव्हन, कोपरगांव संघ हा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. या संघाने रू ७००१ चे बक्षिस मिळविले.