छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेच्या दिनदर्शिकेच्या ह.भ.प. उद्धव महाराजांच्या हस्ते प्रकाशन

छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेच्या दिनदर्शिकेच्या ह.भ.प. उद्धव महाराजांच्या हस्ते प्रकाशन

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 1 Jan 2021, 18:30:00

सभासदांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणाऱ्या छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेला उज्वल भविष्यकाळ ह.भ.प.उद्धव महाराज यांचे गौरवोदगार

नेवासा : नगर येथील छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख ह.भ.प. उद्धव महाराजांच्या हस्ते करण्यात आले.सर्व संचालक मंडळाच्या एकीच्या बळावर पतसंस्थेचा लवकरच उत्कर्ष होईल,सभासदांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणाऱ्या छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेला उज्वल भविष्यकाळ असल्याचे गौरवोदगार ह.भ.प.उद्धव महाराज यांनी यावेळी बोलताना काढले.
यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात दिनदर्शिकेचे प्रकाशन हभप उद्धव महाराज यांच्या हस्ते पतसंस्थेचे अध्यक्ष सुदामराव बनसोडे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे,चंद्रकांत तापकीर,सुनीता बर्वे,भास्कर सिनारे,डॉ.करणसिंह घुले,भाऊसाहेब पालवे,ज्ञानदेव शिंदे,पोपटराव वरखडे,
संतोष देशमुख,भगवान भांड,कुंडलिक भगत,चंद्रकांत खाडे, मनोज बनकर,मुंगसे,संचालक दादासाहेब शेळके,
सुरेश खरड,प्रशांत सातपुते,किशोर जेजुरकर,राजेंद्र बागले,अर्चना कडू, रामदास जाधव,जयराम ठुबे,दादासाहेब डौले,संजय गवळी,अरुण गाढवे,संजय गि-हे,बाळासाहेब मेहेत्रे,अशोक जगदाळे,पवनकुमार गिधे, सुरेश निनावे उपस्थित होते.

प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष सुदामराव बनसोडे यांनी छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेच्या यशस्वीपणे कार्य करणाऱ्या पतसंस्थेच्या कार्याचा आढावा प्रास्ताविकात दिला यावेळी गुरुवर्य उद्धव महाराज यांचे संतपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष सुदामराव बनसोडे यांनी केले तर पतसंस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page