तंत्रज्ञानात अव्वल असणा-या समताचे अनुकरण इतर पतसंस्था करतील – सतीश मराठे
Samata Other credit unions will follow the example of equality in technology – Satish Marathe
समता पतसंस्थेचा घरपोहोच सोनेतारण व लॉकर सुविधेचा शुभारंभ
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 2 Jan 2021, 19:30:00
कोपरगाव: समता पतसंस्था येणार्या ५ वर्षानंतर उपक्रम, योजना व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत महाराष्ट्रात अव्वल असेल आणि समताचे अनुकरण इतर सहकार चळवळीतील पतसंस्था करतील, असे गौरोद्गार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे विद्यमान संचालक सतीश मराठे यांनी समताच्या घर पोहोच सोनेतारण व लॉकर सुविधाचा शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.
नॅशनल फेडरेशन ऑफ बँक अॅड क्रेडीट सोसायटीज या देशातील बँक व पतसंस्था फेडरेशनचे संचालक व सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी म्हणाले कि, समता पतसंस्थेचे चेअरमन .ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी आपल्या पतसंस्थेच्या वाढीबरोबरच राज्यातील पतसंस्थांची चळवळ बळकट करण्यासाठी देखील प्रयत्न केलेले आहेत.
महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सूर्या कॉम्प्लेक्स, बँक रोड कोपरगाव येथील घर पोहोच सोनेतारण व लॉकर सुविधाचा शुभारंभ तसेच क़्यु आर कोडच्या यु.पी.आय. सिस्टीम शुभारंभ सतीश मराठे व उदय जोशी या शनिवारी २ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. रविवारी ३ जानेवारी २०२१ पासून सुविधा ग्राहक व सभासदांसाठी सुरु होत आहे.
यावेळी समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे म्हणाले,’समताचा प्रगतीचा प्रवास हा सभासदांचा आमच्यावर असलेल्या विश्वास आणि त्यांची घेत असलेली काळजी होय. कारण कि ‘आम्ही ग्राहक, सभासदांसाठी विविध सामाजिक उपक्रम व योजनांमधून त्यांना फायदा व्हावा व त्यांना सर्व योजनांची माहिती व्हावी यासाठी सभासदांच्या दृष्टीने विविध विषयांच्या चित्रफिती तयार करून प्रसिद्धीच्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत पोहचविन्याचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केले जात आहे. कोरोनातही जेष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या त्यामुळेच समता ही शहरापुरतीच मर्यादित नसून ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहचत आहे. प्रास्ताविक संचालक संदीप कोयटे यांनी केले. प्रास्ताविकात ते म्हणाले कि, ‘समताने आज मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाईन सुविधांद्वारे सभासदांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच ३१ डिसेंबर २०२० पर्यंत समताचे ठेवी आणि कर्ज मिळून १ हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला असून आजची परिस्थिती लक्षात घेता सोनेतारण कर्जावर विशेष भर देत आहोत.असे सांगितले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने तयार केलेल्या सभासद हिताच्या चित्रफिती दाखविण्यात आली कार्यक्रमाला सतीश मराठे, उदय जोशी , दादाराव तुपकर, नेटविन संचालक अरविंद महापात्रा, मार्केटिंग मॅनेजर मसऊद अत्तार आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर समता पतसंस्थेचे संचालक श्री. सचिन भट्टड, मुख्य कार्यालयातील अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार संदीप कोयटे यांनी मानले.