पतसंस्थांच्या कोटयावधींच्या ठेवींना संरक्षण देण्याची राज्य पतसंस्था फेडरेशनची योजना – काका कोयटे
State Credit Union Federation plans to protect crores of credit deposits – Kaka koyte
शिर्डी बैठकीत Statbilization Fund म्हणुन १०६ कोटीचा निधी देण्याची घोषणा
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 4Jan 2021, 16:00:00
कोपरगाव: महाराष्ट्रातील नागरी सहकारी, महिला सहकारी, ग्रामीण बिगरशेती पतसंस्थांची संख्या १६००० चे वर असून या पतसंस्थांमध्ये १ लाख कोटी रुपयांचे वर ठेवी आहे. या ठेवींना संरक्षण देण्याची योजना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन ने तयार केली असून या योजनेद्वारे पतसंस्थांच्या ठेवींना ५०,००० रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली.
पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देतांना IRDA इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अॅथॉरीटी या संस्थेची परवानगी मिळविण्यापूर्वी विमा हा शब्द वापरता येणार नाही तरी देखील नावात विमा शब्द नसला तरी तत्सम संरक्षण पतसंस्थांच्या ठेवींना आता उपलब्ध होणार असल्याने ठेवीदारांनी पतसंस्थांमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने शिर्डी येथे २ जानेवारी २०२१ रोजी आयोजित राज्यातील प्रमुख पतसंस्था पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया चे संचालक सतीश मराठे, नॅशनल फेडरेशन ऑफ बँक अड क्रेडीट सोसायटीज या देशातील बँक व पतसंस्था फेडरेशनचे संचालक व सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी यांचेसह भारतातील सर्वात मोठी पतसंस्था असलेल्या बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे चेअरमन राधेश्याम चांडक हे उपस्थित होते. महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांना अडीअडचणीचे प्रसंगी अधिकाधिक निधी प्राप्त होण्याचे दृष्टीने Asset Reconstruction Company चे धर्तीवर Statbilization Fund या संस्थेची सहकारी तत्वावर स्थापना करण्याचा निर्णय या प्राथमिक बैठकीत घेण्यात आला. अशा प्रकारची संस्था स्थापन होण्यासाठी Statbilization Fund म्हणुन १०६ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा महाराष्ट्रातील विवीध उपस्थित पतसंस्थांद्वारे केली गेली. तसेच Liqiudity Base Protection Fund हि संकल्पना देखील याच संस्थेद्वारे राबविण्यात येणार आहे. राज्य फेडरेशनचे महासचिव शांतीलाल सिंगी या आम्हाला सहकार चळवळीविषयी अभिमान असल्याने अशा प्रकारची संस्था सहकारी तत्वावर निर्माण करण्याचे आम्ही ठरविले असल्याचे महाराष्ट्रातील विविध स्तरावरून या योजनेचे स्वागत होत आहे.’ महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तसेच भारतातील सर्वात मोठी पतसंस्था असलेली बुलडाणा अर्बंन पतसंस्था, शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्था देश पातळीवर बँका व पतसंस्थांची शिखर संस्था असलेली नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह बँक अॅड क्रेडीट सोसायटी यांचे देखील पाठबळ मिळत आहे. खजिनदार दादाराव तुपकर व उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव यांनी ‘सहकारी तत्वावर स्थापन झालेली अशा प्रकारची हि जगातील पहिलीच संस्था असेल’. मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुरेखा लवांडे यांनी हि संकल्पना जगभरातील पतसंस्था चळवळीला मार्गदर्शक ठरणार असून सहकार क्षेत्रात क्रांतिकारक ठरणाऱ्या या योजनेला सहकार खात्याने देखील प्रतिसाद देऊन सहकार्य करावे. राज्यातील सहकारी पतसंस्थांनी आपले संरक्षण आपणच केले पाहिजे या भावनेने या योजनेची निर्मिती केली आहे.