कोपरगाव शहर पोलिसांची धडक कारवाई! नायलॉन मांजा प्रकरणात दोन जणांवर गुन्हे दाखल

कोपरगाव शहर पोलिसांची धडक कारवाई! नायलॉन मांजा प्रकरणात दोन जणांवर गुन्हे दाखल

Kopargaon city police crackdown! Two charged in nylon cat case

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 4Jan 2021, 18:30:00

कोपरगाव : प्लास्टिक किंवा कुत्री पक्या धाग्या पासून बनवलेल्या नायलॉन मांजाने पतंग उडविणाऱ्या दोन जणांवर गुन्हा कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या मांजामुळे प्राण्यांना व मानवी जीविताला तीव्र इजा होऊन अपघात घडणे जीवितहानी होऊ शकते.पक्षी जखमी होण्याचे, मृत होण्याचे प्रमाण बरेच आहे.हे माहित असताना त्यांनी महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक सी आर टी- २०१५ 20 प्र.क्र./ ३७ /ता.क- २ दिनांक १८ जून २०१६ अन्वये काढलेल्या निर्देशाची अवज्ञा करून इतरांचे जीविताची सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती करून नायलॉन मांजा वापरून पतंग उडवताना
कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार दोन जणांवर कारवाई केली

चिनी नायलॉन मांजा पुरविणारे, खरेदी-विक्री करणारे आणि या मांजाद्वारे पतंग उडविणाऱ्यांविरुद्ध
नायलॉन मांजाच्या वापरामुळे प्राण्यांना व मानवी जीविताला तीव्र इजा होऊन अपघात घडणे जीवितहानी होऊ शकते हे माहित असताना त्यांनी महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक सी आर टी- 2015/प्र.क्र./ 37 /ता.क- 2 दिनांक 18 जून 2016 अन्वये काढलेल्या निर्देशाची अवज्ञा करून इतरांचे जीविताची सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती करून नायलॉन मांजा वापरून पतंग उडवताना आलीम कलीम शेख (२५) रा. दत्त नगर,कोपरगाव व शेरू मुस्ताक शेख शेख (१९) रा. दत्त नगर,कोपरगाव
हे दोघेही रविवारी ३ रोजी सायंकाळी पाच व सहा वाजेच्या सुमारास इनडोअर गेम हॉल जवळ मिळून आले. त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपयाचा मांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश सुरेश नवाळे (३७) ,नेम कोपरगाव शहर पो. स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं ४ /२०२१ व गुरनं ५/२०२१ भा.द.वि. कलम १८८,३३६, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. पवार व पो. ना. बी.एस. कोरेकर हे करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page