कोपरगाव शहर घरात घुसून महिलेचा विनयभंग
Kopargaon city woman broke into a house and raped
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 5Jan 2021, 11:00:00
कोपरगाव : कोपरगाव इंगळेनगर शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेचा घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी पती पत्नीस अटक केली आहे .
शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेचा घरात घुसून आरोपी पत्नीने घराचे बाहेर ओढुन काढुन हिने तिचे केस पकडुन तिस खाली पाडुन तिस लाथाबुक्यांनी मारहाण केली.तर पतीने
तिचा गाउन फाडुन तिचे गळ्यावर तसेच पाठीवर चावा घेवुन तिचा विनयभंग केला आहे. तसेच दोघांनीही तिस घाण घाण शिवागाळ करुन तिस जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नितीन धोंडीराम पवार, विद्या नितीन पवार रा. इंगळेनगर, कोपरगाव
असे अटक केलेल्या संशयित पती पत्नीचे नाव आहे. सोमवारी (४) रोजी , दुपारी दीड वाजेच्या सुमारास या पती पत्नीने महिलेच्या घरात प्रवेश केला. लाथाबुक्यांनी मारहाण केली.तर पतीने तिचा गाउन फाडुन तिचे गळ्यावर तसेच पाठीवर चावा घेवुन तिचा विनयभंग केला आहे. तसेच दोघांनीही तिस घाण घाण शिवागाळ करुन तिस जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप पीडित महिलेने केला असून,गु. रजि. नं व कलम ७/२०२१ भादवि कलम ४५२, ३५४ (ब), ३२४, ३२३,५०४ , ५०६,३४ प्रमाणे गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी संशयितास पती पत्नीस अटक केली असून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ. एस. सी. पवार हे पुढील तपास करीत आहेत.