आयेशा कॉलनी भागातील कत्तलखान्यावर पोलीसांचा छापा ; २ लाख ३६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त
३ जणांना अटक दोन दिवसांची पोलीस कोठडी
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 5Jan 2021, 15:00:00
कोपरगाव : कोपरगाव शहरातील आयेशा कॉलनी भागातील कत्तलखान्यावर पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात काटवनात बांधलेली १६ लहान मोठी जनावरे भुकलेली तहानलेली कत्तलीसाठी आणलेली बांधुन ठेवलेली मिळुन आली.असा २ लाख ३६ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी वसिम फारुख कुरेशी वय (१८), अक्रम फकिर कुरेशी (२७), खलील जमाल कुरेशी (३६) सर्व रा आएशा काँलनी या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयाने त्यांना ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोकॉ.सुरज अग्रवाल यांनी फिर्याद दिली असून याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, काल सोमवारी ४ रोजी आम्हास गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, आएशा कॉलनी येथे मोकऴ्या पटांगणाशेजारी एका पत्र्याचे शेडमध्ये काही इसम गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करत असुन तेथे आसपास काही गोवंश जातीची जनावरे भुकेल्या अवस्थेत काटवनात बांधुन ठेवली आहेत अशी बातमी मिळालेने लागलीच सपोनी बोरसे, पोसई नागरे,पोहेका. राजु पुंड, पोका. राम खारतोडे, पोका. शिंदे, पोका. कुंडारे, पोकॉ. सुंरज अग्रवाल, स.फौ.शैलेंद्र ससाणे यांचेसह सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी काही इसम पत्र्याचे शेडमध्ये वसिम फारुख कुरेशी वय (१८), अक्रम फकिर कुरेशी (२७), खलील जमाल कुरेशी (३६) सर्व रा. आएशा काँलनी कोपरगाव असे गाईचे कत्तल करताना दिसुन आलेने त्यांना जागीच ताब्यात घेतले तसेच आसपास काटवनात बांधलेल्या १६ लहान मोठी जनावरे भुकलेली तहानलेली कत्तलीसाठी आणलेली बांधुन ठेवलेली मिळुन आली असुन सदरची जनावरे अक्रम कुरेशी याचे मालकीची असलेची माहीती मिळाली असुन सदर ठिकाणी १२००० रु. किं.ची एक जर्सी गाय, काळे रंगाची वाकड्या शिंगाची लांब शेपुट, अंदाजे ४.५ फुट उंच व ६ फुट लांब, वय ८ वर्ष, किंमत अंदाजे, १००००रु.किं.ची एक जर्सी गाय, लालसर रंगाची, आखुड शिंगे, लांब शेपुट, अंदाजे ४.५ फुट उंच व ६.५ फुट लांब, वय ३ वर्ष, किंमत अंदाजे,१२०००रु.किं.ची एक जर्सी गाय, पांढरे रंगाची असलेली , आखुड शिंगे, लांब शेपुट,अंदाजे ४.५ फुट उंच व ६.५ फुट लांब, वय ३ वर्ष, किंमत अंदाजे,१५००० रु.किं.ची एक जर्शी गाय, काऴी रंगाची, आखुड शिंगे, लांब शेपुट, अंदाजे ३.५ फुट उंच व ६ फुट लांब, वय ३.५वर्ष, किंमत अंदाजे, १२०००रु.किं.ची एक होस्टेन गाय, काऴे रंगाची, बिगर शिंगे, लांब शेपुट, अंदाजे ४.५ फुट उंच व ६.५ फुट लांब, वय ८ वर्ष, किंमत अंदाजे, २०००रु.किं.ची एक जर्सी गाय, काऴपट रंगाची, आखुड शिंगे, लांब शेपुट, अंदाजे ४.५ फुट उंच व ६.५ फुट लांब, वय १ वर्ष किंमत अंदाजे, १००००रु.किं.ची एक जर्सी गाय, काऴपट रंगाची, आखुड शिंगे, लांब शेपुट, अंदाजे ४.५ फुट उंच व ६.५ फुट लांब, वय ३ वर्ष, किंमत अंदाजे,१०००० रु.किं.ची एक जर्सी गाय, लालसर रंगाची, उभे शिंगे, लांब शेपुट, अंदाजे ४.५ फुट उंच व ६.५ फुट लांब, वय ३ वर्ष, किंमत अंदाजे, ८००० रु. किं.ची एक जर्सी गाय, काऴे पांढरे रंगाची, कपाळावर पांढरे टिपका असलेली अंदाजे ४.५ फुट उंच व ६.५ फुट लांब, वय ६ वर्ष, किंमत अंदाजे, ७००० रु.किं.ची एक जर्सी गाय, पांढरे रंगाची, आखुड शिंगे, लांब शेपुट, अंदाजे ४.५ फुट उंच व ६.५ फुट लांब, वय ८ वर्ष, किंमत अंदाजे, ९००० रु. किं.ची एक जर्सी गाय, काऴे रंगाची, आखुड शिंगे, लांब शेपुट, अंदाजे ४.५ फुट उंच व ६.५ फुट लांब, वय २ वर्ष, किंमत अंदाजे,१२००० रु.किं. ची एक जर्सी गाय काऴे रंगाची, वाकड्या शिंगे, लांब शेपुट, अंदाजे ४.५ फुट उंच व ६.५ फुट लांब, वय ६ वर्ष, किंमत अंदाजे, ११०००रु.किं.ची एक जर्सी गाय, लालसर रंगाची, शिंगे नसलेली लांब शेपुट, अंदाजे ४.५ फुट उंच व ६.५ फुट लांब, वय ६ वर्ष, किंमत अंदाजे, १३००० रु.किं.ची एक गावरण गाय, लालसर रंगाची, उभे शिंगे, लांब शेपुट, अंदाजे ४.५ फुट असा एकून २ लाख ३६ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीस पथकाने हस्तगत केला.
आरोपींनी बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल केलेली व जिवंत १६ गायीच्या जातीची लहाण वासरे, यांना चारा, पाणी न देता क्रुरतेने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता कत्तल करण्यासाठी बांधून ठेवलेल्या स्थितीत आढळून आले अशा फिर्यादीवरुन आरोपींवर भादवि कलम ४२९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९६० चे कलम ५ (अ),(ब),(क)९ व पशु क्रूरता अधिनियम १९६० चे कलम ११ प्रमाणे कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका. राजु पुंड करीत आहेत.