सलग सातव्यांदा डॉ रामदास आव्हाड यांची राष्ट्रीय आयुर्वेद गुरुपदी नियुक्ती
Appointment of Dr. Ramdas Awhad as National Ayurveda Guru for the seventh time in a row
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 13Jan 2021, 18:30:00
कोपरगाव : सलग सातव्यांदा डॉ रामदास आव्हाड यांची राष्ट्रीय आयुर्वेद गुरुपदी नियुक्ती
राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ दिल्ली तर्फे गुरु -शिष्य परंपरेअंतर्गत दरवर्षी संपूर्ण भारतातून अनुभवी व यशस्वी आयुर्वेद वैद्याची निवड राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून केली जाते .त्यानुसार भारतातून विशेष परीक्षेद्वारे निवडले गेलेले आयुर्वेद डॉक्टर्स एक वर्षासाठी या निवडल्या गेलेल्या गुरूंकडे प्रत्यक्ष अनुभवासाठी राहतात .त्यासाठी त्या डॉ शिष्याना मोठे मानधनही शासन दर महिन्याला देत असते .यावेळीही गुरु निवडतांना राष्ट्रीय विद्यापीठ कार्यकारिणीने सलग सातव्यांदा कोपरगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ रामदास आव्हाड यांची राष्ट्रीय गुरुपदी निवड केली आहे. ग्रामीण भागात राहून सलग सातव्यांदा या महत्वपूर्ण पदावर नियुक्ती होणे ही ते करत असलेल्या आयुर्वेद प्रचार व प्रसार कार्याची पावतीच आहे.
आजपर्यंत डॉ आव्हाड यांचेकडे आयुर्वेदाचे प्रशिक्षण घेऊन संपूर्ण भारतभरात आयुर्वेदाद्वारे रुग्ण सेवा देणारे हजारोच्यावर डॉक्टर्स आहेंत .शुद्ध व खात्रीशीर आयुर्वेद उपचार व आयुर्वेद हा सर्वांसाठी ही डॉ आव्हाड यांची ओळख आज आयुर्वेद जगतात झालेली आहे .पंचवीसहून अधिक आंतरराष्ट्रीय -राष्ट्रीय मानाचे पुरस्कार त्यांना आजपर्यंत लाभलेले आहेत .सध्याच्या कोरोना परिस्थितीत आयुर्वेदाला यशस्वी सिद्ध करतांना डॉ आव्हाड आजही कोरोना रुग्णांना मोफत चिकित्सा देत आहेंत .अन्यत्र या संधीचा गैरफायदा घेत पैशांची चाललेली लूट बघता हजाराहून अधिक रुग्णांना त्यांनी लाखो रुपयांची औषधी मोफत देऊन आयुर्वेदाद्वारे नवजीवन दिले आहे .शिर्डी येथे साईंच्या दरबारात गेल्या एकोणवीस वर्ष्यापासून ते दर गुरुवारी न चुकता मोफत रुग्णसेवा देत आहेत .सर्वात लहान वयाचे ,ग्रामीण भागात प्रॅक्टिस करत सलग सातव्यांदा या राष्ट्रीय आयुर्वेद गुरुपदावर नियुक्त होणारे डॉ रामदास आव्हाड हे पहिलेच वैद्य आहेत .ही गोस्ट निश्चितच अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे. कोपरगाव -शिर्डी व नाशिक येथील त्यांचे रुग्णालयात दूरदूरहून व्याधिग्रस्त असलेले हजारो रुग्णांचे येणे व अल्पकाळात ते व्याधीमुक्त होणे ही आयुर्वेदाच्या यशाची पावती देणारे आहे .महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन चे ते गेल्या पाच वर्ष्यापासून अध्यक्ष आहेत .प्रभायुर्वेद ,आयुष कृती समिती ,अशा अन्य आयुर्वेद संघटनावरही ते मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत .





