विकासकामांच्या निविदा नामंजूर ; कोल्हे गटाच्या  नगरसेवकांच्या निषेधार्थ सर्व पक्षीय लाक्षणिक आंदोलन

विकासकामांच्या निविदा नामंजूर ; कोल्हे गटाच्या  नगरसेवकांच्या निषेधार्थ सर्व पक्षीय लाक्षणिक आंदोलन

All-party symbolic movement

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 13Jan 2021, 17:30:00

कोपरगाव : नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विकासकामांच्या निविदा नामंजूर करणाऱ्या कोल्हे गटाच्या नगरसेवकांच्या निषेधार्थ बुधवारी (१३) रोजी  छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व पक्षीय लाक्षणिक निषेध आंदोलन करण्यात आले. कोपरगाव नगरपालिकेत बहुमत असलेल्या कोल्हे गटाकडून मागील चार वर्षापासून विकासकामात सातत्याने राजकारण केले गेल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी केला आहे.
या निषेध आंदोलनात राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय कॉंग्रेस, मनसे आदी मित्र पक्ष सामील झाले होते.

यावेळी बोलताना स्थायी समिती सदस्य मंदार पहाडे म्हणाले, मंगळवारच्या (दि.१२) स्थायी समितीत शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामाबरोबर शहरातील नागरिकांना दैनंदिन उपयोगात येणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांच्या निविदा मंजुरीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र सभागृहात एक बोलायचे व सभागृहाबाहेर एक बोलणाऱ्या सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी या सर्व निविदा नामंजूर केल्या, व शहराचा होणारा विकास थांबविला आहे. असे सांगून पहाडे म्हणाले, आमचे मार्गदर्शक आ. आशुतोष काळे यांनी आम्हाला विकासात राजकारण करायचे नाही असे सांगितलं आहे त्यामुळे आम्ही कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आजपर्यंत सर्वोतोपरी सहकार्य केले आहे व यापुढे देखील करणार आहे. ज्यांना जनतेने बहुमत दिले त्यांनी मात्र जनतेच्या अपेक्षांची राखरांगोळी केली. व विकासात राजकारण ही आपली परंपरा कायम ठेवली आहे. त्यांचे खोटे चेहरे उघडे पाडण्यासाठी आम्ही आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आजचे आंदोलन केले आहे. चार कोटी रुपयांच्या विकासकामांना ना मंजूर करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही असेही मंदार पहाडे शेवटी म्हणाले .

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनिल गंगूले, गटनेते वीरेन बोरावके,मंदार पहाडे, संदीप पगारे, सौ. प्रतिभा शिलेदार,सौ.माधवी वाकचौरे, सौ.सपना मोरे, सौ.वर्षा शिंगाडे, मेहमूद सय्यद, संतोष चवंडके, सुनील शिलेदार, सलीम पठाण, शिवसेना शहरप्रमुख कलविंदर डडीयाल, भरत मोरे, असलम शेख, इरफान पठाण, रायुकॉ शहराध्यक्ष नवाज कुरेशी, महिला कॉंग्रेस तालुकाध्यक्ष शीतल देशमुख, शहराध्यक्ष रेखा जगताप, सुनील साळुंके, तुषार पोटे, अक्षय हंगरे, कृष्णा आढाव, दिनार कुदळे, सुनील बोरा, प्रशांत वाबळे, प्रा.अंबादास वडांगळे, डॉ.तुषार गलांडे, राजूभाई पठाण, मनसेचे सुनील फंड, अनिल गायकवाड,राजेंद्र वाकचौरे, फकीरमामू कुरेशी, रमेश गवळी, दिनकर खरे, रावसाहेब साठे, सौ. मायादेवी खरे, राहुल देवळालीकर, वाल्मिक लहिरे,चंद्रशेखर म्हस्के, राजेंद्र खैरनार,अशोक आव्हाटे, प्रकाश दुशिंग, बाळासाहेब सोनटक्के, संदीप देवळालीकर, एकनाथ गंगूले, गणेश लकारे, राजेंद्र आभाळे, विजय चवंडके,राजेंद्र जोशी, विशाल निकम, दिनेश संत,गोरक्षनाथ कानडे, बेबीआपा पठाण, छायाताई फरताळे, पुष्पा शिंदे आदी उपस्थित होते.

              

            
 

Leave a Reply

You cannot copy content of this page