संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनी कोविड योध्दयांचा सन्मान
Kovid warriors honored on the anniversary of Sanjeevani Yuva Pratishthan
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 13Jan 2021, 18:50:00
कोपरगाव : स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना आजाराच्या प्रादुर्भावापासून इतरांचा बचाव होण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली, त्यांच्या कार्याचा अभिमान वाटतो. राजमाता जिजाउंच्या जयंती दिनी कोपरगावातील कोविड योध्दा म्हणून कार्यरत असलेल्या माता भगिनींचा सन्मान करता आला, त्यांच्या या कार्यापूढे नतमस्तक असल्याचे भावोद्गार विवेक कोल्हे यांनी काढले.
संजीवनी युवा प्रतिष्ठाणच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस,आरोग्य व नगरपालिका स्वच्छता विभागातील महिला भगिनींचा कोविड योध्यां म्हणून सत्कार सोहळा आज दिनांक १२ जानेवारी २०२१ रोजी कोपरगावातील मशाल चौक येवला नाका येथे संपन्न झाला. प्रारंभी राजमाता माँ साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त प्रतिमापूजन संपन्न झाले. या प्रसंगी कोविड योध्या म्हणून महिला पोलीस भगिनी,सरकारी दवाखान्यात सेवा देणाऱ्या आरोग्य सेविका, नगरपालिका स्वच्छता विभाग कर्मचारी यांचा कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे व सौ.रेणुका विवेक कोल्हे व युवतींच्या हस्ते साडी,सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कोल्हे पुढे म्हणाले, जागवूया ज्योत माणुसकीची या मुलमंत्राच्या आधारे सामाजिक कार्यासाठी युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून गेल्या सहा वर्षापर्वी संजीवनी युवा प्रतिप्ठाणची स्थापना करण्यात आली. युवा, पर्यावरण, कृषी, सामाजिक, आरोग्य या पंचसूत्रीप्रमाणे काम सुरू असून या माध्यमातून काम करतांना रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबीरे, कोरोना काळात मास्क, सॅनिटायझर वाटप, कोरोना रुग्णांना जेवनाची सुविधा, वृक्षलागवड,एक राखी जवानांसाठी, सर्वधर्मीय सामुदायक विवाह सोहळा, गो- शाळेत चारा वाटप असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. या सोबत सामाजिक बांधिलकी राखत राष्ट्रप्रेमाची भावना सर्वांमध्ये जागरूत करणे हा प्रयत्न संजीवनी युवा प्रतिष्ठानचा कायम राहिला आहे. जाती-पातीच्या पलीकडे जाऊन एकोपा टिकवण्यासाठी समाजात काम करणे या उद्देशाने नेहमी संजीवनी युवा प्रतिष्ठान प्रयत्नशील असते. याप्रसंगी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, बाळासाहेब पानगव्हाणे, शिल्पा रोहमारे, महेंद्र नाईकवाडे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक व युवती यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे लक्ष्मी पाठक,विजया दुशिंग व जयश्री साळवे या कोरोना योध्यांनी मनोगत व्यक्त केले.