कोपरगाव च्या चेतन वैद्य तरूणाने  पुण्याच्या  सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कार्यकारी अधिकारी

कोपरगाव च्या चेतन वैद्य तरूणाने  पुण्याच्या  सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कार्यकारी अधिकारी

Chetan Vaidya Tarun of Kopargaon is an executive officer at Siram Institute, Pune

कोपरगाव : अंगी जिद्द व नामांकित कंपनीत  काम करायचे अशी  जिद्द बाळगली तर यशाच्या शिखरावर  पोहोचता येते  असेच जणू काही  कोपरगाव च्या  चेतन वैद्य  या तरुणाने  पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट मध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत  मानाचा तुरा खोवला आहे.

खर्‍या अर्थाने ते कोरोना योद्धा असल्याचे म्हटले तर  वावगे ठरणार नाही संपूर्ण जगाचे लक्ष सध्या कोरोना या महामारीवर लस तयार करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडे  लागले आहे.ॲस्ट्राझेनका कंपनी आणि ऑक्सफर्ड  विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचे उत्पादन पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट मध्ये घेतले जात आहे. ब्रिटनमध्ये तयार करण्यात आलेल्या या लसीच्या ब्रिटन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणात चाचण्या घेण्यात येत आहे.त्यातील काही निष्कर्षामुळे कोरना वर मात करण्यासाठी कोव्हिशिल्ड ही लस उपयुक्त ठरणार असल्याचा या संस्थांनी दावा केला आहे. सिरम इन्स्टिट्यूट मध्ये तयार होत असलेली,कोरोना प्रतिबंधक लस ही ९० टक्के  परिणामकारक असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही लस  उत्पादित होत असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट पुणे या कंपनीत कोपरगाव  तालुक्यातील सोमठाणे येथील मूळ रहिवासी  असलेले , शारदा नगर येथे सध्या स्थाईक झालेले  रयत शिक्षण  संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय कोपरगाव येथून सेवानिवृत्त झालेले शिक्षक श्री रामनाथ  विष्णू वैद्य यांचे चिरंजीव चेतन रामनाथ वैद्य हे कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहे. चेतन वैद्य त्यांचे शिक्षण मास्टर इन फार्मसी झालेले आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page