कोरोना काळजी घेवून  मतदानाचा हक्क बजवा- योगेश चंद्रे

कोरोना काळजी घेवून  मतदानाचा हक्क बजवा- योगेश चंद्रे

Take care of Corona and exercise your voting right- Yogesh Chandre

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 14Jan 2021, 19:50:00

वाहन व्यवस्था

कोपरगाव : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीची तयारी निवडणूक शाखेकडून पूर्ण. कोपरगाव : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीची तयारी निवडणूक शाखेकडून पूर्ण झाली असून नागरिकांनी मतदानाला जातांना तोंडावर मास्क लावून कोरोना प्रतिबंधात्मक व्यक्तीगत काळजी घेवून मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा.असे आवाहन राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणुकीत केंद्रस्तरावर कामकाज पहाणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना मास्क व सॅनेटायझर निवडणूक शाखेकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे.तसेच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवडणुक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला आहे.राज्य निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, दौलतराव जाधव,प्रविण लोखंडे यांचे सह निवडणूक निर्णय अधिकारी,क्षेत्रीय अधिकारी निवडणूक प्रक्रिया सुलभतेने होणे कामी विशेष लक्ष ठेवून असणार आहे. २९ ग्रामपंचायत निवडणूकीत एकुण मतदान केंद्र ११२ असून २७२ जागेसाठी ६११ उमेदवार रिंगणात आहेत.६३७८५ मतदार पुरुष ३२८९६ स्रीया ३०८८९ मतदार आहेत. कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान केंद्रस्तरावर प्रत्यक्ष कामकाज पहाणारे केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई, पोलिस कर्मचारी यांचा अंतिम समुह गठीत करुन मतदान यंत्र, नियंत्रण यंत्रासह मतदान केंद्रावर आवश्यक त्या साहित्याचे वितरण करुन मतदान केंद्रावर कामकाज पहाणारे समुह रवाना करण्यात आले.

तसेच टपाल मतदान प्रक्रिया पुर्ण करण्यात आली.शुक्रवार १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७:३० ते दुपारी ५:३० पर्यत मतदान असणार आहे. निवडणूक प्रक्रिया यशस्वीतेसाठी निवडणूक नायब तहसिलदार प्रशांत गोसावी,माधवी गोरे मनिषा कुलकर्णी,अरुण रणनवरे, यांचे सह विविध खातेनिहाय अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page