अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर विश्वाला संस्कार देणारे ठरेल-गुरुवर्य भास्करगिरी महाराज 

अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर विश्वाला संस्कार देणारे ठरेल-गुरुवर्य भास्करगिरी महाराज

The temple of Lord Ramachandra in Ayodhya will be the one who cultivates the world – Guruvarya Bhaskargiri Maharaj

श्रीराम जन्मभूमी विकास निधी संकलन अभियानाचा गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते नेवासे येथून शुभारंभ

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 15 Jan 2021, 16:00:00

नेवासा : जगातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्या येथील नियोजित श्रीराम मंदिर निर्माणकार्याच्या पार्श्वभूमीवर  श्रीराम जन्मभूमी विकास निधी संकलन अभियानाचा गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते गुरुवारी दि.१५ जानेवारी रोजी नेवासे येथून शुभारंभ  करण्यात आला.अयोध्येतील बांधण्यात येणारे प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर हे विश्वाला संस्कार देणारे व माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याची शिकवण देणारे ठरेल असे गौरवोदगार श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यातील सदस्य श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना काढले.

नेवासा नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री मोहिनीराज मंदिर प्रांगणात सकाळी ११.३०  वाजता गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या उपस्थितीत झालेल्या श्रीराम जन्मभूमी विकास निधी संकलन अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी महाराज हे बोलत होते.संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख,जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिराचे प्रमुख ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक,माजी आमदार संभाजीराव फाटके,विश्व हिंदू परिषदेचे मकरंद ढवळे,अनंतराव नळकांडे यावेळी उपस्थित होते.समवेत संकलन अभियानातील युवा कार्यकर्ते स्वप्नील पोतदार यांनी उपस्थित संत महंतांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.तर संघ प्रचारक शुभम वेळेकर यांनी प्रभू श्रीरामचंद्राचे गीत सादर केले.
प्रारंभी प्रभू श्री रामचंद्र,भारतमाता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून संकलन निधी पुस्तकाचे पूजन गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी दर्शन गणेश परदेशी व पाच वर्षीय सुयोग योगेश काळे या बालकांनी साठवलेले खाऊचे पैसे निधीच्या रूपाने गुरुवर्य भास्करगिरी बाबांकडे सुपूर्त करण्यात आले तर माजी आमदार संभाजीराव फाटके यांच्या सर्व परिवाराच्या वतीने २ लाख ५५ हजारांचा निधी यावेळी धनादेशाच्या रूपाने गुरुवर्य भास्करगिरी बाबांकडे देण्यात आला.
यावेळी बोलताना गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मभूमीत त्यांचे मंदिर व्हावे म्हणून गेल्या ४९२ वर्षांपासून संघर्ष सुरू होता संघर्षाच्या ७६ वेळेस चाललेल्या या लढ्यात अनेक साधुसंत स्वयंसेवक,रामभक्त धारातीर्थी पडले,त्यात जवळचे ३६ वर्षात अत्यंत संघर्ष झाले,कोर्टाची लढाई झाली त्यात विजय मिळाला ही सर्व प्रभू रामचंद्रांची लीला आहे,रामाचा महिमा अगाध कसा हे त्याने कळले.
प्रभू श्रीरामचंद्र ही हिंदूंची नव्हे तर विश्वाची देवता आहे,भारताचे अस्थीत्व असणारी देवता आहे,प्रत्येक मनुष्य हदयात असलेला राम आतापर्यंत कोणालाही  पुसता आला नाही.निधी संकलनाच्या निमित्ताने  रामकार्य
होण्यासाठी सर्वजण एकत्रित आलेले दिसत आहे.सर्व जातीधर्माच्या बांधवांचा यात समावेश आहे,त्यामुळे सर्वांचेच हे कार्य आहे निधी संकलन करत असतांना पक्ष जात भेद धर्म याचा विचार करु नका स्वयंसेवक रामभक्त हा गल्ली बोळात दारादारात येणार आहे त्यांना या कार्यासाठी प्रत्येकी दहा रुपये देऊन या कार्यात सर्वांना खारीचा वाटा उचलण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक संघटना व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सतीश मुळे सर यांनी आभार मानले.यावेळी घर टू घर निधी संकलन अभियानात स्व:त भास्करगिरी महाराजांनी सहभाग नोंदवला.

Leave a Reply

You cannot copy content of this page