संजीवनी एम.बी.ए. ऑटोनॉमस दर्जाचा लाभ ; १४ विद्यार्थ्यांची नोकऱ्यांसाठी नियुक्ती – अमित कोल्हे
Sanjeevani M.B.A. Gain of autonomous quality; Recruitment of 14 students for jobs – Amit Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 16Jan 2021, 17:20:00
कोपरगांव – संजीवनी एम.बी.ए.ला २०१९ मध्ये ऑटोनॉमस (स्वायत्त) दर्जा प्राप्त झाला असुन आता २०२१ मध्ये ऑटोनॉमस अंतर्गत शिक्षण घेत असलेली बॅच बाहेर पडत आहे. उद्योग जगताला आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी संजीवनी एम.बी.ए.ने अभ्यासक्रम रचना त्या अनुषंगाने केलेली असल्यामुळे चालु शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये ओम लाॅजिस्टिक्स व माट्रीक्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपन्यांनी एकुण १४ विद्यार्थ्यांची आकर्षक पगारावर नोकऱ्यांसाठी निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी सांगीतले आहे की संजीवनी एम.बी.ए. नेे ओम लाजिस्टिक्स या कंपनीबरोबर सामंजस्य करार केलेला असुन या कंपनीसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी १०० तासांचा अधिकचा अभ्यासक्रम शिकविला जातो. या कंपनीने प्रशिक्षण कालावधीत रू ३. ५ लाखांचे वार्षिक पॅकेज देवु केले आहे. या कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जयेश प्रकाश सेामवंशी , सागर पांडुरग पाचोरे, आकाश राजेंद्र गरूड, रोहित निवृत्ती आवारे, निखिल विठ्ठल देवरे, स्वप्नील मदनसिंग राजपुत, नानासाहेब मधुकर पाईक, ऋषिकेश उत्तम खैरनार, स्वप्नील बापुसाहेब बारहाते, अभिषेक भाऊसाहेब पवार व अविनाश राजेंद्र पवार यांचा समावेश आहे. माट्रिक्स स्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीने अस्मिता दिनेश हिवाळे, मयुर विलास वाघ व मानसी अशोक ठाकरे यांची रू ३ लाख वार्षिक पॅकेजवर निवड केली आहे. इतरही विद्यार्थी इतर कंपन्यांच्या अंतिम फेरी पर्यंत पोहचले आहे. १०० टक्के विद्यार्थांना नामांकित कंपन्यामध्ये नोकरी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक आणि प्राचार्य डाॅ. ए.जी. ठाकुर व विभाग प्रमुख डाॅ. विनोद मालकर यांचे अभिनंदन केले.
Post Views:
248