ग्रामपंचायत निवडणूक : कोपरगाव तालुक्यात ८२.२० टक्के मतदान
ग्रामपंचायत निहाय झालेले मतदान
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 16Jan 2021, 17:00:00
कोपरगाव : तालुक्यात शुक्रवारी , २९ ग्रामपंचायतींसाठी एकून मतदान (६३८७२) झालेले मतदान (५२५००) (पुरुष-२७४७०,स्री-२५०३०), (८२.२०%) टक्के मतदान झाले. असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली.
सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी तिळवणी (९२.६४%)येथे तर सर्वात कमी मतदानाची टक्केवारी सांगवी भुसार(५५.६७) इतकी राहिली आहे सर्वात जास्त मतदान (६६२३)संवत्सर ग्रामपंचायतीचे होते तर सर्वात कमी मतदान(६५७) हिंगणी ग्रामपंचायतीचे होते. सोमवारी तहसीलदार कार्यालय येथे सकाळी सकाळपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे असेही त्यांनी सांगितले.
स्थानिक पातळीवरील हेवेदावे आणि मुद्यांवर रंगणाऱ्या या निवडणुकीसाठीचा मतदारांचा उत्साह अखेरपर्यंत कायम होता. हिंसा वा कोणत्याही अनुचित घटनेचे गालबोट न लागता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडल्याचा दावा पोलिस प्रशासनाने केला आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निहाय एकूण मतदान झालेले मतदान पुढीलप्रमाणे उक्कडगाव एकून मतदान (१९७६) झालेले मतदान (१७४५) ( पुरुष-९०४,स्री-८४१),(८८.३१%) तिळवणी एकून मतदान (८१५) झालेले मतदान (७५५) ( पुरुष-४०९,स्री-३४६),(९२.६४%), अंजनापुर एकून मतदान (१३०७) झालेले मतदान (११६७) (पुरुष-६१७,स्री-५५०),(८९.२९%)घारी एकून मतदान (१२११) झालेले मतदान (१०४१(पुरुष-५५२,स्री-४८९), (८५.९६%),मनेगाव एकून मतदान (७५६) झालेले मतदान (६७६) ( पुरुष-३४४,स्री-३३२),(८९.४२%)मळेगाव थडी एकून मतदान (२१८०) झालेले मतदान (१९०९)(पुरुष-१०२१,स्री-८८८),(८७.५७%) सांगवी भुसार एकून मतदान (२३५३) झालेले मतदान (१३१०)(पुरुष-७१६,स्री-५९४),(५५.६७%) वेळापूर एकून मतदान (२४९६) झालेले मतदान (२०३९)(पुरुष-१०७२,स्री-९६७),(८१.६९%)जेऊर पाटोदा एकून मतदान (२१०५) झालेले मतदान (१६२३)(पुरुष-८३९,स्री-७८४),(७७.१०%)काकडी म. एकून मतदान (२६८८) झालेले मतदान (२३८२(पुरुष-१२५५,स्री-११२७), (८८.६२%)नाटेगांव एकून मतदान (१७३३) झालेले मतदान (१५३३)(पुरुष-८१४,स्री-७१९),(८८.४६%)कासली एकून मतदान (१३१४) झालेले मतदान (११४५)(पुरुष-६११,स्री-५३४),(८७.१४%)ओगदी एकून मतदान (७३४) झालेले मतदान (६६४)( पुरुष-३५१,स्री-३१३),(९०.४६%)अंचलगाव एकून मतदान (८६१) झालेले मतदान (७१८) ( पुरुष-३६१,स्री-३५७),(८३.३९%) कोळगाव थडी एकून मतदान (१६१४) झालेले मतदान (१३९४) (पुरुष-७३९,स्री-६५५),(८६.३७%)
मायगाव देवी एकून मतदान (१४९५) झालेले मतदान (१३३७) ( पुरुष-७०३,स्री-६३४),(८९.४३%)हिंगणी एकून मतदान (७१९) झालेले मतदान (६५७) ( पुरुष-३४४,स्री-३१३),(९१.३८%)रवंदे एकून मतदान (३७४३) झालेले मतदान (३०७५) ( पुरुष-१६२२,स्री-१४५३),(८२.१५%)संवत्सर एकून मतदान (८८४७) झालेले मतदान (६६२३)(पुरुष-३४१७,स्री-३२०६),(७४.८६%)
देर्डे चांदवड एकून मतदान (१३९९) झालेले मतदान (११९९) ( पुरुष-६२७,स्री-५७२),(८५.७०%)मढी खुर्द एकून मतदान (१७१९) झालेले मतदान (१४६४)(पुरुष-७७५,स्री-६८९),(८५.१७%)मढी बुद्रुक एकून मतदान (२२९४) झालेले मतदान (१९१४)( पुरुष-९७८,स्री-९३६),(८३.४४%)धोंडेवाडी एकून मतदान (७८१) झालेले मतदान (६८८) ( पुरुष-३६०,स्री-३२८),(८८.०९%)सोनारी एकून मतदान (९४८) झालेले मतदान (८१७) ( पुरुष-४३१,स्री-३८६),(८६.१८%)आपेगाव एकून मतदान (१३७१) झालेले मतदान (१२७०)(पुरुष-६७३,स्री-५९७),(९२.६३%)येसगाव एकून मतदान (३४२८) झालेले मतदान (२७३२(पुरुष-१४२३,स्री-१३०९), (७९.७०%)टाकळी एकून मतदान (३४९३) झालेले मतदान (२७५२) (पुरुष-१४५८,स्री-१२९४), (७८.७९%)
कोकमठाण एकून मतदान (६५८७) झालेले मतदान (५४९७) ( पुरुष-२८१७,स्री-२६८०),(८३.४५%)जेऊर कुंभारी एकून मतदान (२९०५) झालेले मतदान (२३७४(पुरुष-१२३७,स्री-११३७), (८१.७३%)याप्रमाणे मतदारांनी आपला मतदानाचा बूथ निहाय अधिकार बजावला आहे.आता उमेदवारांसह नागरिकांचे लक्ष सोमवारी (ता.१८) जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागून आहे.
राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे व निवडणुक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीची सर्व तयारी झाली असून निवडणूक नायब तहसिलदार प्रशांत गोसावी, माधवी गोरे,मनिषा कुलकर्णी, अरुण रणनवरे, यांचे सह विविध खातेनिहाय अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, पोनि. दौलतराव जाधव, पोनि.प्रविण लोखंडे,स्पेशल नेमणूक पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे सह निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी मतमोजणी व्यवस्थित पार पडावी या कामी विशेष लक्ष ठेवून आहेत.