डेटाक्वेस्ट  सर्वेक्षणात संजीवनी  अभियांत्रिकी महाविद्यालय देशात २५ वे  – अमित कोल्हे

डेटाक्वेस्ट  सर्वेक्षणात संजीवनी  अभियांत्रिकी महाविद्यालय देशात २५ वे  – अमित कोल्हे

   Sanjeevani Engineering College 25th in the country in dataquest survey – Amit Kolhe                                                 सर्वेक्षणानुसार  संजीवनीचा टेक इनॅबल्ड वर्गवारीमध्ये समावेश

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 19Jan 2021, 17:00:00

कोपरगांवः संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय ग्रामिण भागात असुनही दक्षिण आसिया मधिल एक मोठया  मीडिया ग्रुप तर्फे प्रकाशित होणाऱ्या  डेटाक्वेस्ट या मासिकाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार संजीवनी हे  गुणवत्ता व दर्जाच्या बाबतीत देशात २५ व्या क्रमांकावर, पश्चिम  विभागात ४ थ्या व राज्यातही ४ थ्या स्थानावर असल्याचे जाहिर करून या त्रयस्त माध्यमाने केलेल्या सर्वेक्षणामुळे अगोदरच अनेक किर्तीमान स्थापित केलेल्या संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरेपेचात  अधिकचा एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की मागिल १५ वर्षांपासून  डेटाक्वेस्ट मार्फत देशातील  एनआयटी, आयआयटीसह सरकारी व खाजगी सहभागी अभियांत्रिकी महाविद्यालयांचा पहिल्या १००  संस्थांचा क्रम ठरविला जातो. आाखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या  (एआयसीटीई) अखत्यारीत देशात  सुमारे  ४००० अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. त्यात संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयास ‘१०० टेक इनॅबल्ड’ या बिरूदावलीने घोषित  करण्यात आलेे आहे. यावेळेस डेटाक्वेस्ट या मासिकाने कोविड १९  च्या पार्श्वभूमीवर  दूरभाष्य  प्रणाली शिक्षणाच्या पध्दतींवर भर देवुन पायाभुत सुविधा अद्यतने व सुधारणा, विध्यार्थी आणि शिक्षकांसाठी प्रशिक्षण  आणि कौशल्ये विकास, उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे राबविण्यात येणारे प्रयोग, आधुनिक संसाधनांचा उपयोग, अवलंबविलेले डीजिटल परीवर्तन, आपला डेटा चोरी होवु नये म्हणुन सुरक्षा पालन, दूरभाष्य  प्रणाली मार्फत प्रभावी शिक्षण  आणि इंटरनेट नेटवर्क कमकुवत अथवा नसलेल्या ठिकाणच्या विध्यार्थ्यांपर्यंत शिक्षण  पोहचविण्यात आलेल्या अडचणींवर मात, इत्यादी बाबींचे निकष   लावले होते. याच बरोबर परदेशी भाषांचे शिक्षण , एसएपी अंतर्गत इतर अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण  व संथेच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना  नामांकित कंपन्यांमध्ये मिळणाऱ्या नोकऱ्या  याचीही दखल डेटाक्वेस्टने घेतली. या सर्व बाबतीत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय डेटाक्वेस्टच्या  कसोट्यांमध्ये  उतरले आणि देशात २५ वा, पश्चिम  विभागात व राज्यातही ४ था क्रमांक पटकाविला. महाराष्ट्रात  सुमारे ३३४ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यात पहिल्या १०० मध्ये फक्त ११ महाविद्यालयांचा समावेश  आहे, त्यात संजीवनी ४ थे असल्याने पुन्हा एकदा संजीवनीची गुणवत्ता व दर्जा आणि विद्यार्थ्यासाठी  घेत असलेल्या श्रमांची पुष्टी  मिळाली, असे श्री कोल्हे यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे. संजीवनीच्या या देशव्यापी गुणवत्तेबदल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हेे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्राचार्य डाॅ. ए.जी.ठाकुर, सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक आणि संजीवनीच्या प्रयत्नांना प्रतिसाद देणारे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे अभिनंदन केले आहे.          

Leave a Reply

You cannot copy content of this page