दुसरा टप्पा : २०२० च्या अतिवृष्टीची ४ कोटी ६४ लाखाची नुकसान भरपाई -आ. आशुतोष काळे
Phase II: Compensation of Rs. 4 crore 64 lakhs for excess rainfall of 2020. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 19Jan 2021, 17:30:00
कोपरगाव :जून ते ऑक्टोबर २०२० या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीच्या पूराने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागाला घेऊन पंचनामे करून घेतले . झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वीच नुकसानभरपाईच्या पहिल्या हफ्त्याची ३ कोटी १ लाख रुपयांची रक्कम मागील वर्षी शेतकऱ्यांना मिळालेली आहे व दुसऱ्या टप्प्यातील ४ कोटी ६४ लाख ५८ हजार रुपयांची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांची काढणी करून मोकळ्या जागेवर सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांचे ज्या ठिकाणी ढिगारे लावले होते त्या पिकांना जागेवरच मोड आल्याची आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्वतः पाहणी केली होती. या नुकसान भरपाईसाठी आमदार काळे यांनी,पुनर्वसन व महसूल विभागाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून दुसऱ्या टप्प्याची ४ कोटी ६४ लाख ५८ हजार रुपयांची रक्कमही महाविकास आघाडी सरकार कडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून नैसर्गिक संकटाच्या वेळी शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेची चाके रुतलेली असतांना महाविकास आघाडी सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा दुसरा हफ्ता दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना. अजितदादा पवार, मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानले आहे.





