विरोधकांचा भांडाभोड ; “सहमती एक्सप्रेस मालामाल,नगरपालिका कंगाल” पत्रकांचे जनतेत वाटप

विरोधकांचा भांडाभोड ; “सहमती एक्सप्रेस मालामाल,नगरपालिका कंगाल” पत्रकांचे जनतेत वाटप

The quarrel of the opponents; Distribution of leaflets “Sahamati Express Malamal, Nagarpalika Kangal”

शहरात पत्रके वाटताना सेना-भाजपा मित्र पक्षांचे नगरसेवक

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 19Jan 2021, 19:50:00

कोपरगांव : एक तर रस्त्याच्या सर्व कामांची तांत्रिक मंजुरी सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून घेणे ऐवजी त्यांच्या सोयीसाठी जाणुन बुजुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची तांत्रिक मंजुरी घेतली , एवढ्यावरच न थांबता त्यांनी केलेल्या अंदाजपत्रकीय दराने १२ कामे त्यांनी घरात बसून वाटप केल्या, त्याही त्यांच्याच मर्जीतील सहमतीच्या ठेकेदारांना त्यांनीच केलेल्या अंदाजपत्रके दराने मिळणार होत्या, म्हणूनच तीच १२ कामे स्थायी समितीसमोर ठेवण्यात आली होती. असा गंभीर आरोप करून जनहितार्थ ती १२ कामे आम्ही नामंजूर केली, आता हे बालंट आपल्या अंगावर येऊ नये म्हणून विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभुल करण्यासाठी नगराध्यक्ष व विरोधकांनी आमच्यावर खोटे आरोप करून कांगावा केला असल्याने विरोधकांचा भांडाभोड करण्यासाठी “सहमती एक्सप्रेस मालामाल, नगरपालिका कंगाल” या पत्रकाचे वाटप शिवसेना -भाजप, रिपाई मित्रपक्ष नगरसेवकांच्या वतीने मंगळवारी शहरातील जनतेत करण्यात आले.

कोपरगांव नगरपरिषदेने दिनांक १० नोव्हेंबर रोजी एकुण २८ कामांच्या निवीदा प्रसिध्द केल्या होत्या. त्या पैकी काही निविंदाची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर २०२० व काही निविदांची ५ डिसेंबर होती, वरील सर्व निविदा साधारण १० ते १५ डिसेंबर २०२० पर्यंत मंजुर झाल्या पाहिजे होत्या, व त्याच वेळी स्थायी समितीची सभा घेतली पाहिजे होती, परंतु तसे न करता नगराध्यक्षांनी व नगरपालिकेला सोयीची असणारी फक्त १२ कामे मंजुरीसाठी ठेवली, राहिलेली १६ कामे मिटींग समोर का आली नाही ? उर्वरित प्रभागातील जनतेशी दुजाभाव कशासाठी ? याचे उत्तर मात्र नगराध्यक्ष व प्रशासनाने अद्याप पर्यंत आम्हाला दिले नाही.

चार वर्षात नगराध्यक्षांनी ३६ ऐवजी केवळ १३ सर्वसाधारण सभा घेतल्या, त्यावेळी या मनमानी व हेकेखोरपणा बद्दल नगराध्यक्षांना शहर विकासाचा ध्यास घेतलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जाब का विचारला नाही ? असा सवाल करून केवळ ना मंजुरीच्या नावाखाली राष्ट्रवादी नगरसेवकांकडून एकीकडे नगराध्यक्षांची पाठराखण केली जात आहे तर दुसरीकडे जनतेची दिशाभूल केली जात आहे. यावरून नगराध्यक्ष व सहमती एक्सप्रेस यांचे संगनमत स्पष्टपणे दिसुन येत असल्याचा आरोप पत्रकात  करण्यात आला आहे.

पत्रके वाटतांना भाजप महिला नगरसेविका व पदाधिकारी

गेल्या चार वर्षात भाजपा सेना नगरसेवकांनी शहर विकासाचे सकारात्मक धोरण घेऊन नगराध्यक्ष मुख्याधिकारी यांच्या शब्दावर विश्वास ठेवून वेळोवेळी सर्वसाधारण सभेत सर्वच्या सर्व विषय बहुमताने मंजूर केलेले आहेत. ही सत्य वस्तुस्थिती आहे.

ही सर्व कामे नगरपालिका फंड, १४ व्या वित आयोग आणि रस्ता अनुदान या फंडातुन होणार आहे. आमदारांचा निधीशी कवडीचा ही संबंध नाही. आम्ही जनहिताच्या दृष्टीकोनातुन विरोध केला. हे सर्व माहित असुन सुध्दा जनतेची दिशाभुल करणाऱ्या नगराध्यक्ष व विरोधकांचा भांडाफोड करण्यासाठी खरी वस्तुस्थिती काय आहे हे जनतेपुढे आणण्यासाठी “सहमती एक्सप्रेस मालामाल… नगरपालिका कंगाल” चे वस्तुस्थितीचे पत्रक शहरात वाटप करण्यात आले.

आर्किटेक्चर व सुपरव्हिजन फी नावाखाली ४० ते ५० लाखांची उधळपटी करण्याचे काय ? रस्त्यांची सर्व कामे नगराध्यक्ष , मुख्यधिकारी आणि बांधकाम अभियंता यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडुन फेर अंदाजपत्रक बनवुन व तांत्रिक मंजुरी घेवुन नविन निविदा प्रसिध्द कराव्या या सर्व नविन फेरनिविदांना मंजुरी देण्यास आम्ही तयार आहोत, असे आवाहन शेवटी पत्रकाव्दारे केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page