सौ. सुशीलामाई काळे यांना २१ व्या पुण्यस्मरण निमित अभिवादन

सौ. सुशीलामाई काळे यांना २१ व्या पुण्यस्मरण निमित अभिवादन

Hundred Greetings to Sushilamai Kale on the occasion of 21st Remembrance Day

स्व.सौ. सुशिलामाई काळे यांच्या यांच्या २१ व्या पुण्यस्मरणानिमित अभिवादन करतांना माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे, कार्यकारी संचालक गिरीश जगताप.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 20Jan 2021, 14:50:00

 कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक कर्मवीर शंकरराव काळे  यांना सामाजिक, राजकीय क्षेत्रात खंबीर साथ देवून ग्रामीण भागातील मुलींच्या उच्च शिक्षणासाठी शाळा –महाविद्यालय सुरु करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सौ. सुशीलामाई काळे यांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पुण्यस्मरणानिमित आदरांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक जेष्ठसंचालक माजी आमदार अशोकराव काळे, चेअरमन आमदार आशुतोष काळे, संचालक राजेंद्र मेहेरखांब, कार्यकारी संचालक गिरीश जगताप, भास्करराव काळे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबासाहेब सय्यद, असिस्टंट सेक्रेटरी एस.डी. शिरसाठ, चीफ अकौंटंट एस. एस. बोरनारे, बोरनारे, शेतकी अधिकारी कैलास कापसे, आदी मान्यवरांसह विविध विभागाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सौ.सुशीलामाई काळे यांच्या पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबिर प्रसंगी विश्वस्त सिकंदर चांद पटेल, प्राचार्या सौ.विजया गुरसळ, डॉ.नीता पाटील आदी.

चौकट

फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याहीवर्षी संजीवनी रक्तपेढी कोपरगाव यांच्या सहकार्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या उपाय योजना करून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उदघाटन संस्थेचे विश्वस्त सिकंदर चांद पटेल यांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ होत्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page