राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मासिक अभियान: रस्ता सुरक्षा खबरदारीविषयी जनजागृती करणे-भरत नागरे 

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मासिक अभियान: रस्ता सुरक्षा खबरदारीविषयी जनजागृती करणे-भरत नागरे

National Road Safety Monthly Campaign: Raising awareness on road safety precautions – Bharat Nagre

सर्वांनी सुरक्षेचे नियम पाळावेत   Everyone should follow the rules of safety

फोटो ओळी – संघटनेच्यावतीने सपोनि भरत नागरे यांचा सत्कार राजेंद्र झावरे, कैलास जाधव, राजेंद्र सालकर यांनी केला.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 20Jan 2021, 16:50:00

कोपरगाव : राज्यस्तरावर साजरा होत असलेल्या ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मासिक अभियानाचे मुख्य उद्दीष्ट वाहन चालक व सामान्य जनतेत रस्ता सुरक्षा खबरदारीविषयी जनजागृती करणे  असल्याचे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत नागरे यांनी केले.

  राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना मोहिमेअंतर्गत वाहन चालकांना रस्ता सुरक्षा नियमांची जाणीव व्हावी या उद्देशाने बुधवारी (२०) रोजी सप्तर्षी मळा येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात आयोजित  कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेच्या  सभासदांच्या कार्यक्रमात  सपोनि भरत नागरे बोलत होते.   
यावेळी संस्थेचे संस्थापक शिवसेना नगर उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, संघटनेचे अध्यक्ष उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, संघटनेचे उपाध्यक्ष पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र सालकर, संचालक मल्हारी देशमुख, वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख इरफान शेख, संघटनेचे  सभासद पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने हजर होते.
यावेळी बोलतांना संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र सालकर म्हणाले,जेंव्हा आपण रस्ता सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करतो तेंव्हा ते केवळ आपली सुरक्षाच सुनिश्चित करत नाही, तर अपघाताच्या धोक्यापासून दूर ठेवते. आजकाल वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे आणि जास्त वेगामुळे रस्ते अपघात अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस  वाढत आहे, त्यामुळे अनेक मौल्यवान आयुष्य आपल्या जीवनातून बाहेर पडले आहे.मुळात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान,सडक सुरक्षा जिवण रक्षा या १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी  महिना मोहिमेचे उद्दीष्ट वाहन चालकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे हा आहे.
 सपोनि भरत नागरे पुढे म्हणाले,  की रस्ते अपघात रोखण्यासाठी परिवहन व पोलिस विभागामार्फत नियमितपणे तपासणी केली जाते.  परंतु तरीही ड्रायव्हर्स वाहन चालवताना नियमांबद्दल जागरूक नसतात आणि संवेदनशील नसतात, विशेषतः ओव्हरटेक करण्याची वेगाची स्पर्धा व्यसन  व नियमांचे पालन न करणे, वेळोवेळी वाहनाची सर्विसिंग करणे खबरदारी न घेणे या गोष्टी अपघातास कारणीभूत होतात. वाहन चालविताना  बेफिकीरपणा ही स्वतः एक गंभीर चिंता बनली आहे.  पूर्वी करण्यात आलेले रस्ते  चढ-उतार, वेडीवाकडी वळणे  अशी असल्याने त्या ठिकाणी गाडी चालविताना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.   आपल्या मुलांना  दुचाकीवरून प्रवास करताना लायसन असणे तसेच त्याला डोक्यावर हेल्मेट घालणे सक्तीचे करावे जेणेकरून अपघात झाल्यास सुरक्षितता मिळेल.  वाहतुकीच्या नियमांबाबत वाहनचालकांनी संवेदनशील बनून ते आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनवावेत जेणेकरून रस्ते अपघातांना रोखता येईल, रस्ते अपघात कमी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे  आवाहन त्यांनी शेवटी  केले.शेवटी आभार उपाध्यक्ष राजेंद्र सालकर यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page