ग्रामपंचायत निवडणुक: विवेक कोल्हे यांचे यश युवकांना प्रेरणादायी; देवेंद्र फडणवीस
यांची शाबासकीची थाप
Gram Panchayat elections: Vivek Kolhe’s success inspires youth; Devendra Fadnavis s applause
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 20Jan 2021, 18:20:00
कोपरगाव : कोपरगाव मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीत उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि तळागाळातील जनतेपर्यंत जाऊन काम करण्याची जिद्द यामुळेच विवेक कोल्हे यांनी मिळविलेले उल्लेखनीय यश युवकांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल अशा शब्दात माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शाबासकीची थाप दिली.
नुकत्याच पार पडलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीतील मिळालेल्या यशानंतर युवा नेते विवेक कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी विवेक कोल्हे यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे उपस्थित होत्या. राज्यभरामध्ये भारतीय जनता पार्टीने ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश संपादन केले असून ही विजयाची घौडदौड राज्यभरात सुरू असतांना कोपरगाव विधानसभा मतदार संघात झालेल्या ३२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये २२ ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक मते व बहुमत मिळविण्यात भारतीय जनता पार्टीला मोठे यश मिळाले आहे.