मनशांतीसाठी ध्यानधारणा व अध्यात्माची गरज: सौ.चैताली काळे

मनशांतीसाठी ध्यानधारणा व अध्यात्माची गरज: सौ.चैताली काळे

Need for meditation and spirituality for peace of mind: Mrs. Chaitali Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 20Jan 2021, 19:20:00

 कोपरगाव : ज्ञानातून आंतरिक शक्तीचा स्रोत निर्माण होतो. त्यामुळे अस्थिर आणि अशांत मनाला शांती मिळते गाढ झोपी पेक्षाही शरीर आणि मनाला ध्यानाने आराम मिळतो. त्यामुळे मनशांतीसाठी ध्यानधारणा व अध्यात्म अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैताली काळे यांनी कोपरगाव येथे राजयोगिनी संतोषदीदी यांच्या सत्कार प्रसंगी केले.

महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा येथील होनल इन्चार्ज राजयोगिनी संतोषदीदी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या महाराष्ट्र संचालिका यांना गोवा राज्याकडून ग्लोबल कौन्सिल फॉर प्रोफेशनल एज्युकेशन मिशनच्या माध्यमातून डॉक्टरेट पदवी मिळविल्याबद्दल कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चैताली काळे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा कोपरगाव येथे नवनिर्मित वाढीव सत्संग हॉलचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी, ब्रह्माकुमारी सरला दीदी, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, आदी हजर होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page