ट्रक घेण्यासाठी ९ लाखाची  मागणी करत विवाहितेचा छळ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ट्रक घेण्यासाठी ९ लाखाची  मागणी करत विवाहितेचा छळ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Harassment of a married woman demanding Rs 9 lakh for a truck; Crimes filed against 9 persons

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 21Jan 2021, 21:30:00

कोपरगाव : ट्रक घेण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू, सासरे, दीर भाया आणि नणंद नंणदई यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिंगणापुर येथे घडला.

 नवनाथ बाळासाहेब कुऱ्हे नवरा,  बाळासाहेब लक्ष्मण कुऱ्हे सासरे,ललीता बाळासाहेब कुऱ्हे  सासु, वाल्मीक बाळासाहेब कुऱ्हे भाया,  सौ. मालती जगदिश डांगळ,नणंद, जगदिश मांगु डांगळ,नणंद, रा. शिंगणापुर ता. कोपरगाव, शोभा महेंद्र नाटकर, ननंद, महेंद्र नाटकर, नणंदई  रा, बालाजी नगर, कडोदरा, ता.जि. सुरत (गुजरात),  सतिष कानडे (ननंदई) रा. शिरसगाव लोकी ता. येवला, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २१ वर्षीय पूजा नवनाथ कु-हे या विवाहितेने गुरुवारी २१ रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार मे २०१७ ते सप्टेंबर २०२०  कालावधीत घडला. आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी महिलेला उपाशी ठेवले. तसेच पतीने ट्रक घेण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे आणण्याची विवाहितेकडे मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला तिला मारहाण, शिवागीळ, दमदाटी करुन तिला घराबाहेर काढुन दिले, असल्याचे विवाहितेने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे.
कोपरगाव  शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना./८५६ ए. एम. दारकुंडे  तपास करीत आहेत.
                                         
  

Leave a Reply

You cannot copy content of this page