धक्कादायक : मुलाच्या नोकरीचे आमिष दाखवून चक्क नायब तहसीलदार बाईची १ लाख ३२ हजाराची फसवणूक

धक्कादायक : मुलाच्या नोकरीचे आमिष दाखवून चक्क नायब तहसीलदार बाईची १ लाख ३२ हजाराची फसवणूक

Shocking: Chakka Deputy Tehsildar cheated Rs 1 lakh 32 thousand by showing lure of child’s job

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 21Jan 2021, 21:21:00

कोपरगाव: विश्वास संपादन करून एम. एस. ई. बी. कार्यालयात तुमच्या मुलास क्लार्कची नोकरी लावून देतो या नावाखाली एक लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक उघड झाली आहे. याविरोधात कोपरगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बाईंनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव
मनिषा प्रभाकर कुलकर्णी (४४) धंदा, नोकरी रा. गुलमोहोरकॉलनी, इंदिरापथ यांचा मुलगा नोकरीच्या शोधात होता. नोकरीची जाहिरात वाचून नगर येथे एम. एस. ई. बी. कार्यालयात गेली असता तिथे आरोपी नितीन शहाजी धुमाळ रा. मुसळवाडी, ता. राहुरी जि. अहमदनगर हा भेटला व त्याने आपणास तुमच्या मुलास क्लार्कची नोकरी लावून देतो मला तीन लाख रुपये द्या, आता दीड लाख व नंतर राहिलेले दीड लाख रुपये द्या, अशी मागणी आपल्याकडे केली. आपला  विश्वास संपादन करुन  मुलास नोकरी लावण्याचे अमिष दाखवुन एप्रिल २०१८ ते जुन २०१८ रोजी पावेतो वारंवार त्यांचेशी गोड बोलुन त्याचेकडुन १,३२०००/- रु रक्कम त्याचे स्वतःचे एम.एस.ई.बी. ऑफीस अ.नंगर येथे तसेच अंक्सीस बॅक शाखा खात्यात जमा करुन घेवुन त्यांची फसवणुक केली आहे.
पीडित मुलाचे आई कोपरगाव नायब तहसीलदार यांनी गुरुवारी २१ रोजी सायंकाळी कोपरगाव शहर पोलिसात तक्रार नोंदवली.कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. ३९१ आर. पी. पुंड हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page