जेऊर पाटोदा येथे गाडीला धडक दिल्यावरून वाद; गुन्हा दाखल
Dispute over hitting a vehicle at Jeur Patoda; Filed a crime
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 22Jan 2021, 13:30:00
कोपरगाव : तालुक्यातील जेऊर पाटोदा येथे नागरी पेट्रोल पंपा समोर तुमच्या पाहुण्याने गाडीला धडक दिल्याचा जाब विचारण्यावरून गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास दोन गटात वाद उफाळला. याप्रकरणी शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी भाऊसाहेब मोतिराम भाबड, यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाणीत फिर्यादी भाऊसाहेब मोतिराम भाबड व सलीम पठाण हे दोघे जखमी झाले आहेत.सतीश रमेश केकान,संकेत सुनील केकान, किरण रमेश केकान, संदेश मच्छिंद्र केकान, सुनील पुंजाजी केकान, मच्छिंद्र पुंजाजी केकान, निखिल चंद्रकांत पिंगळे सर्व राहणार.जेऊर पाटोदा,तालुका कोपरगाव.यांच्याविरोधात कोपरगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल आर पी पुंड हे पुढील तपास करीत आहेत.