कोणाच्या गळ्यात पडणार सरपंच पदाची माळ ? ; २८ जानेवारीला आरक्षण सोडत

कोणाच्या गळ्यात पडणार सरपंच पदाची माळ ? ; २८ जानेवारीला आरक्षण सोडत

Who will get the post of Sarpanch? ; Leaving reservation on 28th January

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 22Jan 2021, 20:00:00

कोपरगाव : नुकताच ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. आता सरपंच आरक्षण कधी निघणार? याकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते. त्यांची प्रतीक्षाही संपली असून, येत्या २८ जानेवारीला तालुक्‍यांतील ७५ ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी शिर्डी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता तहसीलदार कार्यालयाच्या मिटींग हॉल दुसरा मजला येथे काढण्यात येणार आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोग प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे यांनी प्रसिध्दीस दिली.

निवडणुकीपूर्वी शासनाने सर्व आरक्षण रद्द केले. निवडणुकीनंतर नव्याने आरक्षण सोडत काढले जाणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पहिल्यांदा आरक्षण सोडतीत आरक्षित झालेल्या जागांसाठी अनेक जण संरपचपदाचे बाशिंग बांधून होते. तालुक्यात नुकतेच २९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक संपली. त्यानंतर आता सर्वांच्या नजरा सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लागलेल्या आहेत. तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींचे आरक्षण २०२० ते २०२५ या पाच वर्षासाठी नव्याने काढले जाणार आहे. त्यासाठी २८ जानेवारीचा मुहूर्त ठरला आहे.

आपल्या प्रवर्गाचे आरक्षण यावे, यासाठी सर्वांनीच देव पाण्यात ठेवले आहेत. त्यामुळे नवीन आरक्षण सोडतीत कोणते बदल होणार, याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. ग्रामपंचायतींमधील ५० टक्के पद हे महिलासाठी आरक्षित असणार आहेत. त्यामुळे कोणत्या गावांची ग्रामपंचायत महिलेच्या हाती जाणार, यावर २८ जानेवारीला शिक्कामोर्तब होणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page