रोहमारे पेट्रोल पंपावरून डंपर चोरला; ४ जणांना अटक, पाच दिवसाची पोलीस कोठडी
Rohmare stole a dumper from a petrol pump; 4 arrested, five days police custody
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 22Jan 2021, 16:30:00
कोपरगाव : झगडे फाटा येथील दादा शहाजी रोहमारे पेट्रोल पंपाच्या आवारात लॉक करून पार्क केलेला डंपर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. होता. कोपरगाव तालुका पोलिसांनी अकरा दिवसात डंपरसह चार आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सतीश पुरुषोत्तम देशमुख रा. कोल्हे रोड, छत्रपती कॉलनी, गेवराई यांनी याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२ जानेवारी रोजी दुपारी तीन ते साडेचार वाजेच्या दरम्यान फिर्यादी देशमुख यांनी त्यांचा दहा लाख रुपये किमतीचा दहा टायर चा डंपर क्रमांक एम एच २४ जे ७००८ हा सिन्नर रोड वरील दादा शहाजी रोहमारे या खाजगी पेट्रोल पंपावरील विकास सहकारी सोसायटीच्या आवारात लॉक करून पार्क केला. दुपारी अज्ञात चोरट्यांनी डंपर चोरून नेला. हा प्रकार २ जानेवारी २०२१ रोजी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी १० जानेवारी रोजी फिर्यादी देण्यात आली आहे होती. कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी राहुल कैलास धनगाव रा. भोजडे यास अटक केली, पोलिसी खाक्या दाखवून विश्वासात घेऊन त्याच्याकडून चौकशी केली असता त्याने प्रताप उर्फ पप्पू रमेश काटे रा. धोत्रे, रोहित संजय घाटे रा. धोत्रे, अर्जुन अशोक आहेर रा. भोजडे अशा पाच जणांनी मिळून सदर डंपर २ जानेवारी दुपारी तीन ते चार साडेचार वाजेच्या सुमारास रोहमारे पेट्रोल पंपावरून चोरून नेला असल्याचे कबूल केले. या सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी केली, असता फिरोज मन्सूर शेख मेहुनबारे ता. चाळीसगाव जिल्हा जळगाव यांना विकला असल्याचे सांगितले. पोलिसांचे पथक मेहुणबारे येथे रवाना झाले. मोठ्या शिताफीने डंपर व डंपर विकत घेणारा फिरोज मन्सूर शेख याला डंपर सह ताब्यात घेऊन कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आणले. सर्व आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना २५ जानेवारीपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पोसई सचिन इंगळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख, पोलीस हेडकॉन्स्टेबल अर्जुन बाबर, पोलीस कॉन्स्टेबल जयदीप गवारे, होमगार्ड वाईकर, सायबर सेल श्रीरामपूरचे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव यांनी केली आहे. अवघ्या अकरा दिवसात आरोपीसह डंपर परत मिळविल्याने कोपरगाव तालुका पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.